For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

तोल सांभाळणे लाभदायक, सूर्यनमस्कारही सकारात्मक

07:00 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
तोल सांभाळणे लाभदायक  सूर्यनमस्कारही सकारात्मक

आपल्याला आपल्या शरीराचा तोल सांभाळता आला पाहिजे. तोल सांभाळण्याचा सराव तुम्ही करू शकता. शरीराचा तोल सांभाळण्याचे लाभ जाणून घेऊ.

Advertisement

  • तोल सांभाळण्याच्या सरावामुळे तुमचे सांधे, स्नायू बळकट होतात. गुडघे, पायाच्या घोट्यालगतच्या स्नायूंना याचा लाभ होतो.
  • शरीराचा तोल सांभाळण्याचे तंत्र गवसल्यामुळे दुखापतीची शक्मयता कमी होते.
  • शरीराचा तोल सांभाळण्याचा सराव करण्याआधी शरीराची क्षमता तपासून घ्या. यासाठी एका पायावर उभे रहा. अशा स्थितीत किती वेळ उभे रहाता येते हे बघा. साधारण मिनिटभर या स्थितीत उभे रहाता यायला हवे.
  • तोल सांभाळण्यासाठी स्क्वॅट्स करायला सुऊवात करा. यामुळे पाय, पोटऱ्या आणि मांड्यांचे स्नायू बळकट होतील आणि एका पायावर तोल सांभाळणे शक्मय होईल.
  • एका पायावर शरीराचा तोल सांभाळायचा सराव करा. स्क्वॅट्सच्या तुलनेत हा व्यायामप्रकार थोडा कठीण आणि गुंतागुंतीचा आहे. मात्र यामुळे तुम्हाला तोल सांभाळण्याचे तंत्र गवसेल.
  • योगासने करताना शरीराच्या स्थितीत सतत बदल होत असतात. यामुळे शरीराचा तोल साधणे शक्मय होते. अगदी साधी योगासने करतानाही वेगवेगळ्या स्नायूंवर ताण येतो. या सगळ्याचे लाभ शरीराला होतात. सूर्यनमस्कार घातल्यानेही शरीराचा तोल सांभाळण्याचे तंत्र शिकता येईल.
Advertisement
Tags :
×

.