For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामाचा दर्जा कायम ठेवा ; बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या सूचना

कामाचा दर्जा कायम ठेवा   बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या सूचना
मालवण शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवणे कामाची बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी पाहाणी केली. (अमित खोत, मालवण)
Advertisement

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला नगरपरिषदेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. खड्डेमुक्त मार्ग राहावेत. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नगरपरिषदकडून कामे प्रगतीपथावर सुरु आहेत. सुरु असलेल्या खड्डे बुजवणे कामाची बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक ललित चव्हाण उपस्थित होते. कामाचा दर्जा कायम ठेवा असे सांगत रस्त्यांची दुरुस्ती टिकाऊ पद्धतीने झाली पाहिजे, अशा सूचना बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी दिल्या.

Advertisement

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असल्याने शहरातील प्रमुख रस्ते, वर्दळीची ठिकाणे तसेच नागरिकांची मोठी ये-जा असलेल्या सर्वच मार्गांवरील खड्डे प्राधान्याने बुजविण्यात येत आहेत. मागील काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने काम करण्यात अडचणी आल्या मात्र आता काम सुरु करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासनाने दुरुस्तीची कार्यवाही हाती घेतली असून, उर्वरित आवश्यक ठिकाणीही कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार आहेत.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहाराच्या विकासासाठी, जन सेवेसाठी व समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध असल्याचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.