For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महवश करणार अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण

06:25 AM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
महवश करणार अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण
Advertisement

पंचायत सीरिजमधील ‘सचिव जी’ आता गुलाब हकीमच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. जितेंद्र कुमार यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘टेढी हैं पर मेरी हैं’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून यात महवश देखील दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रेमो डिसूजा करत असून जयेश प्रधान दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहे. चित्रपटात प्रेमाला हलक्या-फुलक्या शैलीत सादर करण्यात आले.

Advertisement

या चित्रपटाला इस्माइल दरबार यांचे संगीत लाभले आहे.  एक निर्माता म्हणून मला नेहमीच वास्तविकतेशी ताळमेळ राखणाऱ्या कहाण्या भावल्या आहेत. ‘टेढी हैं पर मेरी हैं’ ची कहाणी तशीच आहे. यात कॉमेडी आणि संवेदनशीलतेला उत्तम पद्धतीने दर्शविण्यात आल्याचे रेमोने म्हटले आहे. या चित्रपटात अनफिल्टर्ड प्रेमाची भावना दर्शविण्यात आली आहे. या चित्रपटात सुंदरपणे त्रुटीयुक्त आणि खरी व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी आव्हान होते. सर्वात सुंदर नाते अनेकदा अपूर्ण असते याची जाणीव असलेल्या लोकांना हा चित्रपट पसंत पडेल असे जितेंद्र कुमारने म्हटले.

ही केवळ प्रेमकथा नसून सुंदर पद्धतीने मांडलेली कहाणी आहे. सर्व व्यक्तिरेखा खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या आणि अपूर्ण आहेत, याच लोकांना आपण आयुष्यात जाणत असतो, असे उद्गार महवशने काढले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.