महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सदस्यत्व रद्द करण्यावरून महुआ मोईत्रांची सर्वोच्च न्यायालयाकडे दाद

06:23 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर  कधी सुनावणी होणार हे तत्काळा स्पष्ट करण्यात आलेले नाही. ‘पॅश फॉर क्वेरी’ प्रकरणी शिष्टाचार समितीच्या शिफारशीनंतर महुआ यांचे संसद सदस्यत्व शुक्रवारी रद्द करण्यात आले होते. महुआ यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप झाल्यानंतर शिष्टाचार समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने प्रदीर्घ चौकशीनंतर शुक्रवारी लोकसभेत आपला अहवाल सादर केल्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्त्व रद्द करत सभागृहातून हकालपट्टी केली होती.

Advertisement

शिष्टाचार समितीने अहवालात महुआ मोईत्रा यांना सभागृहातून बाहेर काढण्याची शिफारस लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. अहवाल सादर केल्यानंतर लोकसभेत सुमारे तासभर चर्चा झाली आणि त्यानंतर महुआ मोईत्रा यांचे संसद सदस्यत्त्व रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला होता. साहजिक कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच संसदेत पोहोचलेल्या मोईत्रा यांची संसदेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article