For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिंद्राच्या चाकण येथील उत्पादन प्रकल्पातून आजवर 30 लाख वाहनांची निर्मिती

06:37 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिंद्राच्या चाकण येथील उत्पादन प्रकल्पातून आजवर 30 लाख वाहनांची निर्मिती
Advertisement

त. भा. वृत्तसंस्था पुणे

Advertisement

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या अत्याधुनिक चाकण उत्पादन प्रकल्पाने एकूण 30 लाख वाहनांच्या उत्पादनाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला.  या टप्प्यातील 30 लाखावी निर्मिती म्हणून महिंद्राची सर्वात प्रगत फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘बीई 6’ ही गाडी ठरली आहे. इंटर्नल कम्बशन इंजिन तसेच इलेक्ट्रिक दळणवळण या दोन्ही प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीस पाठबळ देत सक्षम अशा भविष्याभिमुख उत्पादन केंद्रामध्ये या प्रकल्पाचे झालेले रूपांतर या टप्प्यातून दिसून येते.

डिसेंबर 2009 मध्ये पहिले वाहन उत्पादन केंद्रातून बाहेर आल्यानंतर, चाकण प्रकल्प महिंद्राच्या दृष्टीने सर्वाधिक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या उत्पादन प्रकल्पांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे. पहिल्या 1 दशलक्ष वाहनांच्या तुलनेत जवळपास चारपट अधिक वेगाने, केवळ 27 महिन्यांत अलीकडील 1 दशलक्ष वाहनांचे उत्पादन पूर्ण करण्यात या प्रकल्पाने यश मिळवले. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाचे अध्यक्ष आर. वेलुसामी म्हणाले, “चाकण उत्पादन प्रकल्पातून आमच्या 3 दशलक्षाव्या वाहनाचे, म्हणजेच बीई 6 चे उत्पादन पूर्ण होणे हा महिंद्राच्या उत्पादन प्रवासातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. अलीकडील 1 दशलक्ष वाहनांचे उत्पादन केवळ 27 महिन्यांत पूर्ण होणे हे आमच्या ग्राहकांचा वाढता विश्वास तसेच आमचे कर्मचारी, भागीदार आणि पुरवठादार यांच्या अतूट बांधिलकीचे प्रतीक आहे. चाकण प्रकल्पात इंडस्ट्री 4.0, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज , 5 जी कनेक्टिव्हिटी, प्रगत रोबोटिक्स, डिजिटल ट्रेसेबिलिटी आणि लीन तसेच टीपीएम पद्धतींवर आधारित लवचिक मल्टी-मॉडेल उत्पादन प्रणाली यांचा समन्वय साधण्यात आला आहे. या सर्व क्षमतांमुळे जबाबदार उत्पादन प्रक्रियेलाही चालना देत आम्हाला जागतिक दर्जाची गुणवत्ता, लवचिकता आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादन क्षमता सादर करता येते.

Advertisement

मोठ्या प्रमाणावर लवचिक उत्पादन क्षमता: एकात्मिक उत्पादन केंद्र 657 एकरांवर पसरलेल्या चाकण उत्पादन प्रकल्पात इंटर्नल कम्बशन इंजिन, प्रवासी वाहने, इलेक्ट्रिक वाहने आणि व्यावसायिक वाहनांसह 19 मॉडेल्स आणि 450 हून अधिक व्हेरिएंट्सचे उत्पादन केले जाते.

Advertisement
Tags :

.