For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिंद्राच्या कार विक्रीमध्ये 27 टक्के वाढ, निर्यातीत मात्र घसरण

06:10 AM Jan 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिंद्राच्या कार विक्रीमध्ये 27 टक्के वाढ  निर्यातीत मात्र घसरण
Advertisement

कोलकाता :

Advertisement

महिंदा आणि महिंद्रा या ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनीने मागच्या डिसेंबर महिन्यात एकूण कार विक्रीमध्ये 27 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. डिसेंबर महिन्यात महिंद्राने जवळपास 85501 कार्सची विक्री केली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात पाहता 67,252 कार्सची विक्री करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात निर्यातीत मात्र जवळपास 9.3 टक्के इतकी घसरण झाली असून 2849 महिंद्राच्या गाड्यांची निर्यात करण्यात आली आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने 3142 कार्स निर्यात केल्या होत्या.

उत्पादनात झाली वाढ

Advertisement

दुसरीकडे उत्पादनात मात्र कंपनीने वाढ केल्याचे पाहायला मिळाले. डिसेंबरमध्ये कंपनीचे उत्पादन 25 टक्के वाढीसोबत 68 हजार 992 इतके राहिले होते. मागच्या वर्षी या अवधीमध्ये 55 हजार 015 कार्सचे उत्पादन घेण्यात आले होते. देशांतर्गत बाबतीत पाहता कार्सच्या मागणीत वाढ झाली असून विक्री आणि उत्पादन दोन्हीतही वाढ झाली आहे.

Advertisement
Tags :

.