For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिंद्राची बीई 6 फॉर्म्युला इ इलेक्ट्रीक कार लाँच

06:25 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिंद्राची बीई 6 फॉर्म्युला इ  इलेक्ट्रीक कार लाँच
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

ऑटोमोबाइल क्षेत्रातील महिंद्रा आणि महिंद्रा यांनी आपली नवी बीई 6 फॉर्म्युला इ एडिशन अंतर्गतची कार नुकतीच लाँच केली आहे. ही गाडी एफइ व एफइ फोर या दोन प्रकारात सादर करण्यात आली आहे. या गाडीची एक्सशोरुम किमत 24.45 लाख रुपये इतकी असल्याचे कळते. मागच्या फॉर्म्युला इ एडीशनच्या लाँचच्या वर्षाच्या आतच नवे मॉडेल सादर करण्यात आले आहे.

नव्या फॉर्म्युला इ एडिशन मॉडेलमध्ये काही महत्त्वाचे बदल केले गेले आहेत. याखेपेला पूर्वीप्रमाणे गाडीला फ्रंट व रियर डीआरएल, गोल एलईडी हेडलाइटस व अवजड बंपर दिले गेलेले नाही. याखेपेला या गाडीचा लुक अगदी स्टँडर्ड बीई 6 स्पोर्टेक प्रमाणे आहे. सी शेपचा फ्रंट व रियर डीआरएल व स्लीक बंपर देण्यात आला आहे. ही गाडी रोसो इम्पुल्सो या नव्या रंग पर्यायासह सादर करण्यात आली आहे. गाडीच्या अंतर्गत भागात 12.3 इंचाचा टच स्क्रीन दिला असून फायरस्टॉर्म ऑरेंज रंगाची स्कीम वापरण्यात आली आहे.

Advertisement

आणखी काय सुविधा

पॅनारोमिक ग्लास रुफ यात असेल. यात 16 स्पीकरचा हर्मन कार्डन साऊंड सिस्टम असून ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग पॅड, व्हेंटिलेटेड फ्रंड सिटस, एंबियंट लाइटिंग व पॉवर्ड ड्रायव्हर सीट दिली आहे. सुरक्षेसाठी 540 डिग्रीचा कॅमेरा आहे. यात पुन्हा गुगल जेमिनी इंटीग्रेशन, इन कार गेमिंग व कराओके सूटस, ऑटो डिटेक्शनयुक्त युजर प्रोफाइल्स व कस्टम ड्राइव्ह मोडचा समावेश आहे. या गाडीत 79 केडब्ल्यूएचची बॅटरी असून कार एकदा चार्ज केल्यावर 683 किमीचे अंतर कापते, असा दावा कंपनी करते. बॅटरी चार्ज होताना 20 ते 80 टक्के इतकी केवळ 20 मिनीटात चार्ज होते.

Advertisement
Tags :

.