महिंद्रा स्कॉर्पिओ-एन नवे मॉडेल झेड4 एटी लाँच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पिओ-एन चा एक नवीन व्हेरिएंट, झेड4 ऑटोमॅटिक व्हेरिएंट लाँच केली आहे. सदरच्या गाडीचा बेस हा मॉडेल झेड2 च्या अवलंबून आहे. यामुळे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह स्कॉर्पिओ एन आणखी स्वस्त झाली आहे.
पूर्वी झेड4 व्हेरिएंट फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध होता. आता तो पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांसह 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देण्यात आला आहे. याशिवाय, कारमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.
झेड 4 डिझेल ऑटोमॅटिकची किंमत 17.86 लाख रुपये आहे. या अपडेटपूर्वी, स्कॉर्पिओ-एन मधील ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय आहेत. 4 व्हील ड्राइव्ह पर्यायासह डिझेल इंजिन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन मध्ये 2.0-लिटर एमस्टॅलियन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि एमहॉक डिझेल इंजिन आहे. पेट्रोल इंजिन असलेली एसयूव्ही 203 एचपी पॉवर आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले 370 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. वैशिष्ट्यो: अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 8-इंच टचक्रीन स्कॉर्पिओ-एन 70 हून अधिक कनेक्टेड फीचर्ससह येते. 8-इंच टचक्रीन, वायर्ड अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स आदी सुविधा आहेत.