महिंद्रा अँड महिंद्राचा नफा 44 टक्क्यांनी वाढला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशांतर्गत विविध क्षेत्रातील समूह महिंद्रा अँड महिंद्राचा सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱया तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 44 टक्क्यांनी वाढून 2,773 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत समूहाने 1,929 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वाढून 29,870 कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत 21,470 कोटी रुपये होते. स्टँडअलोन आधारावर, महिंद्रा अँड महिंद्राचा तिमाहीत महसूल 57 टक्क्यांनी वाढून 20,839 कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 13,314 कोटी रुपये होता. या तिमाहीत स्टँडअलोन आधारावर निव्वळ नफा 46 टक्क्यांनी वाढून 2,090 कोटी रुपये झाला आहे. ऑटो क्षेत्रातील प्रमुख कंपनीने दुसऱया तिमाहीत 1,74,098 वाहनांची विक्री केली, जी गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीतील 99,334 वाहनांच्या तुलनेत 75 टक्के जास्त आहे.