For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा करणार 37,000 कोटींची गुंतवणूक

06:32 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा करणार 37 000 कोटींची गुंतवणूक
Advertisement

2030 पर्यंत कंपनी आणखी वाहने कंपनी सादर करण्याच्या तयारीत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आपल्या वाहनांचा ताफा वाढवण्याच्या तयारीत आहे. आगामी काळात 2030 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी 9 एसयूव्ही, 7 इलेक्ट्रिक वाहने आणि 7 हलकी व्यावसायिक वाहने सादर करण्याची कंपनीची योजना आहे. आर्थिक वर्ष 2025 ते 2027 पर्यंत व्यवसायात 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. कंपनी पुढील तीन वर्षांत एकूण 37,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यापैकी प्रत्येकी 5 हजार कोटी रुपये कृषी व्यवसाय आणि सेवा व्यवसायात गुंतवले जाणार आहेत, असेही कंपनीने म्हटले आहे.

Advertisement

महिंद्रा अॅड महिंद्राच्या संचालक मंडळाने ईव्ही कंपनी महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलमध्ये 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ही रक्कम कंपनी पुढील तीन वर्षांत ईव्हीच्या उत्पादनावर खर्च करणार आहे. राजेश जेजुरीकर, कार्यकारी संचालक आणि सीईओ  (ऑटोमोटिव्ह आणि कृषी क्षेत्र), महिंद्रा अँड महिंद्रा यांनी सांगितले की, महिंद्राने पूर्णपणे विकसित केलेली पहिली ईव्ही 2025 च्या पहिल्या तिमाहीत रस्त्यावर उतरेल. ते म्हणाले की 2027 पर्यंत कंपनीच्या एकूण विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 20 ते 30 टक्के असेल.

ब्रिटीश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटने 1,200 कोटी रुपये आणि टेमासेकने महिंद्राच्या ईव्ही युनिटमध्ये 300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. टेमासेकने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीत 1,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. महिंद्रा अँड महिंद्राने सांगितले की, उर्वरित 900 कोटी रुपयेही निर्धारित वेळेत गुंतवले जातील.

Advertisement
Tags :

.