For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

महिंद्राची बोलेरो नव्या अवतारात लाँच

06:06 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिंद्राची बोलेरो नव्या अवतारात लाँच
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने आपल्या बोलेरोला पुन्हा नव्याने लाँच केले आहे. बोलेरो बोल्ड एडिशन 2026 मॉडेल कंपनीने नुकतेच बाजारात उतरवले आहे. बाह्या व अंतर्गत बाबतीत काही बदल नव्याने या गाडीत करण्यात आल्याची माहिती आहे.

गाडीत बदल करताना विविध भागात ब्राँझ रंगाचा अंमल करण्यात आला असून सोबत रियर व्ह्यू कॅमेरा देण्यात आला आहे. एक लक्षात घ्या की याच्या इंजिन व पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 2026 च्या नव्या मॉडेलमध्ये फ्रंट बंपर, ग्रिल व फॉग लँप यांच्या आसपास ब्राँझ रंगाचे अॅक्सेंटस् आहेत. हा रंग अलॉय व्हील्स, ओआरव्हीएम कॅप्स, डोअर क्लॅडिंग व रुफ रेल्सच्या बाबतीत वापरण्यात आलेला आहे.

Advertisement

केबिनमध्ये रियर व्ह्dयू कॅमेरा हे नवे फिचर देण्यात आले आहे. याशिवाय या एडिशनमध्ये ब्लॅक रंगाच्या लेदर सिटस व खास फ्लोअर मॅटसही दिल्या आहेत. 1.5 लिटर, 3 सिलेंडर डिझेल इंजिन या गाडीला असणार असून ही गाडी रियर व्हील ड्राइव्ह सेटअपसह असून यात 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स असणार आहे. गाडीत पाहता मॅन्युअल एसी, स्टीअरिंग माऊंटेड कंट्रोल्स, 7 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टम, युएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट व पॉवर विंडोव्हही यात असेल.

किती असणार किंमत

नवी बोलेरोची एक्स शोरुम किमत 8 लाख 57 हजार रुपये ते 9 लाख 99 हजार रुपये इतकी असणार आहे.

Advertisement
Tags :

.