For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मुसाफिर कॅफे’मध्ये महिमा मकवाना

06:33 AM Jul 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मुसाफिर  कॅफे’मध्ये महिमा मकवाना
Advertisement

‘12 वी फेल’मध्ये स्वत:च्या अभिनयाद्वारे सर्वांना चकित केल्यावर विक्रांत मैसी आता ‘मुसाफिर कॅफे’मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात विक्रांतसोबत महिमा मकवाना आणि वेदिका पिंटो मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट दिव्या प्रकाश दुबे यांच्या पुस्तकावर आधारित आहे. यात प्रेम, लालसा आणि आत्मशोधाची कहाणी दाखविण्यात येणार आहे.

Advertisement

टीझरची सुरुवात विक्रांत साकारत असलेल्या भूमिकेच्या व्हॉइसओवरने होते, ज्यात तो स्वत:ला एक मुसाफिर म्हणून सादर करतो. या भूमिकेचे नाव चंदर आहे, ज्याची कहाणी त्याचा कॅफे ‘मुसाफिर कॅफे’शी निगडित आहे. टीझरमध्ये त्रिकोणी प्रेमाचे संकेत दिसून येतात, चंदरची भूमिका दोन महत्त्वपूर्ण नाती निभावत असते, एक उत्साही महिला वेदिका पिंटो साकारत असलेली भूमिका सुधासोबत आणि दुसरी महिमा मकवानाची भूमिका प्रीतिसोबत.

मुसाफिर कॅफेची कहाणी शरण्या राजगोपाल यांनी लिहिली आहे. तर रुचिर अरुण याचे दिग्दर्शक आहेत. यात विक्रांत, महिमा आणि वेदिकासोबत आदिल हुसैन, राजीव सिद्धार्थ, अनुभा फतेहपुरिया, लवलीन मिश्रा, सादिया सिद्दीकी हे कलाकार दिसून येणार आहेत. मुसाफिर कॅफे चित्रपट 24 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.