महेश मुरलीधर पै आता साउथ इंडियन बँकेच्या एमडी-सीईओपदी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महेश मुरलीधर पै हे साउथ इंडियन बँकेचे नवीन एमडी आणि सीईओ होणार आहेत. त्यांच्या नियुक्तीला आरबीआयने मंजुरी दिली आहे. 16 जुलै 2026 रोजी होण्राया संचालक मंडळाच्या बैठकीत आणि भागधारकांनी मंजुरी दिल्यास, त्यांचा कार्यकाळ 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल. आरबीआयने महेश मुरलीधर यांच्या साउथ इंडियन बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
बँकिंग क्षेत्रातील जवळपास 30 वर्षांच्या अनुभवामुळे महेश मुरलीधर पै यांचे नाव सध्या चर्चेत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने महेश मुरलीधर पै यांच्या साउथ इंडियन बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्तीला मंजुरी दिली आहे. कॅनरा बँकेसह अनेक मोठ्या संस्थांच्या संचालक मंडळावरही आहेत आणि त्यांनी अनेक मोठ्या भूमिका बजावल्या आहेत.