For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारिवडे उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड

03:56 PM Jan 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कारिवडे उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड
Advertisement

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा!

Advertisement

ओटवणे|प्रतिनिधी
कारिवडे गावच्या उपसरपंचपदी महेश नारायण गांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या खास बैठकीत महेश गावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.कारिवडे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटात ठरल्याप्रमाणे तुकाराम बाबाजी आमुणेकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी कारिवडे गावच्या सरपंचा सौ. आरती अशोक माळकर, ग्रामसेवक भरत बुंदे, माजी उपसरपंच तुकाराम आमुणेकर, नितीन गावडे, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी कवठणकर, सौ. तन्वी साईल, सौ. अरुणा सावंत, सौ. प्रतिभा जाधव उपस्थित होत्या. दरम्यान भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बॅक संचालक महेश सारंग, भाजपा आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, भाजपा युवा नेते विशाल परब, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, बाळू माळकर, संतोष बिले, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर मेस्त्री, भाजपा आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, गावचे प्रमुख मानकरी बाबा गांवकर, चेतन गांवकर, माजी सरपंच लक्ष्मण सावंत, विठ्ठल परब, उमेश गावकर, प्रशांत राणे अमोल कारीवडेकर, शंभा खडपकर, रवींद्र ठाकूर, टीळाजी जाधव, पोलिस पाटील प्रदीप केळुसकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महिला व ग्रामस्थांनी महेश गावकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.