For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वायरी भूतनाथ जि.प. मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

01:25 PM Jan 30, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वायरी भूतनाथ जि प  मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
Advertisement

अक्षता गावडे, मानसी भोगावकर यांना निवडून आणण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

Advertisement

चौके । प्रतिनिधी

वायरी भूतनाथ जिल्हा परिषद सदस्य पदाचे भाजप शिवसेना पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार अक्षता राजन गावडे तर पंचायत समिती चौके शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार मानसी भोगावकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ चौके ग्रामदेवता श्री भराडी देवी मंदिर येथे बुधवारी सकाळी श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी चौके पंचक्रोशी सह कुंभारमाठ,कर्लाचाव्हाळ आनंदव्हाळ, नांदरुख, देवली येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.गेली बरीच वर्षे या भागातून जिल्हापरिषद उमेदवारी मिळाली नव्हती. शिवसेना माजी तालुका अध्यक्ष राजन गावडे यांनी यावेळी तरी चौके गावाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून पक्ष नेतुत्त्वाकडे प्रयत्न केले त्यात त्यांना यश आले असून चौके गावात अक्षता गावडे यांना तिकीट देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांनी चौके गावातून जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी मिळाली असल्याने चौके पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आपल्या हक्काच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून आई भराडी देवीच्या आशीर्वादाने शिवसेना भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार अक्षता राजन गावडे तसेच चौके पंचायत समिती सदस्य म्हणून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार मानसी भोगावकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या मतदार संघातील ग्रामस्थांनी केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.