For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Political News | महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध

04:40 PM Jun 05, 2026 IST | NEETA POTDAR
political news   महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध
Advertisement
बाळ माने यांची नाट्यमयरीत्या निवडणुकीतून माघार
रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात निवडणुकीत ऐन माघारीच्या दिवशी गुरुवारी राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे शिवसेना उपनेते बाळ माने यांनी नाट्यमयरीत्या निवडणुकीतून माघार घेतली.
बाळ माने यांच्यासह रिंगणात असलेल्या इतर पाच उमेदवारांनीही माघार घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला. या घडामोडींनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघात जल्लोष केला.
या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणच्या राजकारणात 'महाट्विस्ट' पाहायला मिळाला. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी सर्वात आधी शेकापचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेतला.
मात्र खरी खळबळ उडाली ती दुपारच्या सुमारास. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने हे थेट राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
Advertisement

झाले.
बाळ माने यांनी नीतेश राणेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. महाविकास आघाडीसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून यामुळे कोकणातील महायुतीची पकड अधिक घट्ट झाली आहे.

घोडेबाजार टाळण्यासाठी माघार : बाळ माने
निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे माघारीचा अर्ज सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बाळ माने म्हणाले, या निवडणुकीत एकूण ९०१८ मतदार असून सुरुवातीपासूनच महायुतीचे पारडे जड होते. महाविकास आघाडीकडे केवळ २०० च्या आसपास मते होती.
निवडणुकीच्या नावाखाली सुरू झालेला घोडेबाजार कोकणच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नव्हता. तसेच उमेदवारी अर्जासाठी आवश्यक असणारे सूचक मिळवताना मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य लाभले नाही. त्यामुळे घोडेबाजार रोखण्यासाठी आणि बहुमत नसल्याचे स्पष्ट झाल्यानेच आपण माघार घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.