महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महायुतीचा १० पैकी १० जागांवर विजय

11:35 AM Nov 24, 2024 IST | Radhika Patil
Mahayuti wins 10 out of 10 seats
Advertisement

महाविकास आघाडी ठरली निष्प्रभ: लाडकी बहीणसह अन्य योजना प्रभावी : एक्झिट पोलचे अंदाज ठरले फोल

Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीने झालेल्या सहतीत महायुतीने १० पैकी १० जागांपर दणदणीत विजय मिळवून महाविकात आघाडीचा सुफडासाफ केला, एक्झिट पोलसह राजकीय विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवत जिल्ह्यात महायुतीने निर्विवादपणे यश संपादन करून जिल्हा महाविकास आघाडीमुक्त केला आहे. लक्षवेधी लढत ठरलेल्या कागत विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांनी विजयी षटकार मारला असून राधानगरीतून आमदार प्रकाश आबिटकर यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे, हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे यांच्यासह मावळते आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांना आपले गड सुरक्षित राखण्यात यश मिळाले, तर चंदगडमधून भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यानी बाजी मारली.

जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. या मतदारसंघातील विजयी झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील, राधानगरीत शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर, कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे अमल महाडिक, करवीरमधून शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके, कोल्हापूर उत्तरमधून शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर, शाहूवाडीतून जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. विनय कोरे, हातकणंगलेतून जनसुराज्य शक्ती पक्षाचे दलितमित्र डॉ. अशोकराव माने, इचलकरंजीतून भाजपचे राहुल आवाडे तर शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले.

जिल्हयातील १० जागांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चार जागा मिळाल्यामुळे शिवसेना जिल्ह्यात मोठा भाऊ ठरली आहे. भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा आणि अपक्ष उमेदवाराला एक जागा मिळाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातून १२१ उमेदवार रिंगणात होते.

शनिवारी सकाळी आठ वाजता १० मतदारसंघातील मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी झाली. यानंतर ईव्हीएम मशीनमधील फेरीनिहाय व मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासून काही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते. पण मतमोजणीच्या फेऱ्या वाढतील केंद्रांवर त्याप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांचे मताधिक्य वाढत गेले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर राहिले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सर्वच मतदारसंघातील कल स्पष्ट होऊ लागला. यामुळे महायुतीच्या उमेदवारांमध्ये विजयाचा विश्वास निर्माण झाला. हळूहळू महायुतीच्या कार्यकर्त्यांची उमेदवारांच्या संपर्क कार्यालय तसेच निवासस्थानी गर्दी होऊ लागली. मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये मताधिक्य वाढत जाईल त्याप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत होता. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत होता.

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीने केलेल्या प्रचाराला चांगले यश मिळाले होते. राज्य आणि केंद्र पातळीवरील महायुतीचे सरकार जनतेविरोधात भूमिका घेत असल्याचे पटवून देण्यामध्ये 'मविआ" यशस्वी ठरल्यामुळे महायुतीची मोठी पीछेहाट झाली होती. राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर गद्दारीचा ठपका ठेवून त्यांना लोकसभेच्या प्रचारामध्ये नामोहरम करण्याचा प्रयत्न केला होता. भाजप नेत्यांवरही पक्ष फोडोफोडीचा आरोप 'करून त्यांच्यावर 'मविआच्या नेत्यांनी निशाणा साधला होता. या सर्व घडामोडी तटस्थपणे पाहणाऱ्या मतदारराजाने मात्र गेल्या तीन वर्षात झालेली राजकीय उलथापालथ आणि नैतिक राजकारण या वाढत बाबींचा सर्वंकष विचार करून महाविकास उत्साह आघाडीच्या बाजूने मतदानाचा हक्क जयाचा बजावला होता. त्यामुळे लोकसभेच्या निकालाचा अभ्यास करून महायुतीने युतीच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नवीन केलेल्या अजेंडा निश्चित केला.

लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीणसह अन्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गेल्या अडीच वर्षातील 'गद्दारी"चा मुद्दा विधानसभा निवडणुकीत निष्प्रभ ठरविण्यामध्ये महायुती यशस्वी ठरली. तसेच प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिप्पणी टाळून केंद्र आणि राज्य सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. याशिवाय जो समाजघटक महायुतीपासून दुरावला आहे, त्यांच्यासाठी विविध महामंडळांची स्थापना करून त्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जनतेने आपला स्पष्ट कौल महायुतीच्या बाजूने दिला असल्याचे स्पष्ट झाले.

सात निवडणुका आणि सहा विजय

यापूर्वी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी एकूण आठवेळा निवडणूक लढवली होती. त्यापैकी सहा निवडणुकांमध्ये त्यांचा विजय झाला होता. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आतापर्यंत एकूण सातवेळा निवडणुका लढविल्या आणि त्यापैकी सलग सहावेळा त्यांनी विजय मिळवला. गेल्या २५ वर्षांच्या आमदारकीपैकी मुश्रीफ १९ वर्षे मंत्रीपदी राहिले आहेत.

महायुतीला मिळाला योजनांचा परतावा

लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषीपंपांना मोफत वीज, मुलींना मोफत उच्च शिक्षण, वयोश्री आदी विविध योजना महायुतीने राबविल्यामुळे जनमताचा स्पष्ट कौल महायुतीला मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'सतेज पॅटर्न' ठरला अयशस्वी
आमदार सतेज पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरु असलेली यशस्वी घोडदौड लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली होती. गत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे चार आमदार झाले होते. तर शिक्षक मतदारसंघामध्येही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर विजयी मोहोर उमटवली होती. लोकसभा निवडणुकीमध्येही कोल्हापूरच्या शाहू छत्रपती यांना विजयी करून त्यांनी आपल्या राज्यव्यापी सक्षम नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळेच त्यांच्यावर 'मविआ" च्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार त्यांनी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची मोट बांधून ताकदीने प्रचार केला. त्यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न देखील केले. पण महायुतीच्या रणनीतीपुढे अखेर सतेज पॅटर्न अयशस्वी ठरला.

हिंदुत्वाचा मुद्दा ठरला प्रभावी

जनसामान्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांबरोबरच युवकांच्या मनावर हिंदुत्वाचा मुद्दा बिंबवण्यामध्ये महायुती यशस्वी ठरली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत झालेले जातीय आणि धार्मिक मतांचे ध्रुवीकरण रोखण्यामध्येही महायुती यशस्वी झाल्याचे विधानसभेच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

सात माजी आमदारांपैकी तिघांनी पुन्हा मारले मैदान

निवडणूक रिंगणातील सात माजी आमदारांपैकी राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा गड जिंकून परभवाचे उट्टे काढले. तर शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील, शिरोळचे उल्हास पाटील, राधानगरीचे के. पी. पाटील, हातकणंगलेचे डॉ. सुजित मिणचेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

कोल्हापूर झाले महाविकास आघाडीमुक्त

जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गटाचा एकही आमदार झाला नाही. त्यामुळे जिल्हा महाविकास आघाडीमुक्त झाला आहे. २०१४ साली जिल्हा काँग्रेसमुक्त झाला होता. तेच चित्र या विधानसभा निवडणुकीतही निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article