For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Municipal Election 2026 : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, सांगली महापालिकेत रंगतदार सामना

07:12 PM Jan 16, 2026 IST | NEETA POTDAR
sangli municipal election 2026   महायुती विरुद्ध महाविकास आघाडी  सांगली महापालिकेत रंगतदार सामना
Advertisement

                                  आठ वर्षांनंतर सांगली महापालिकेसाठी मतदान,

Advertisement

सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी तब्बल आठ वर्षांनंतर मतदान प्रक्रिया पार पडली असून सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. एकूण २० प्रभागांतील ७८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ३८१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.

अनेक प्रभागांमध्ये दिग्गज उमेदवार रिंगणात असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष सांगली महापालिकेकडे लागून राहिले होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली होती. जसजशी मतमोजणी पुढे सरकली, तसतसे काही प्रभागांमध्ये गुलालाची उधळण तर काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटले.

Advertisement

यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, महायुतीतील तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, तर महाविकास आघाडीमध्येही मतभेद दिसून आले. शिवसेना (ठाकरे गट) स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरली होती.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत एकूण ७८ प्रभाग असून सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत आवश्यक आहे. २०२६ ची ही निवडणूक पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि शहरी विकास या मुद्द्यांसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची राजकीय परिस्थिती यामुळे विशेष चर्चेत राहिली आहे.

२०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ८७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले होते. काँग्रेसने २० जागांसह दुसरा क्रमांक मिळवला होता. त्याचबरोबर एमआयएमला ८, शिवसेनेला ४, राष्ट्रवादीला १ आणि इतर पक्षांना मर्यादित यश मिळाले होते.

Advertisement
Tags :

.