महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समाजातील विविध घटकांना उपयुक्त योजना राबविणाऱ्या महायुतीच्या पाठीशी राहा- माजी आमदार चंद्रदीप नरके

03:21 PM Oct 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
Former MLA Chandradeep Narke
Advertisement

सांगरूळसह परिसरातील गावात विकास कामांचा शुभारंभ

सांगरूळ /वार्ताहर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारची महाराष्ट्रात वेगाने विकासाची घोडदौड चालू आहे. समाजातील विविध घटकांना उपयुक्त अशा अनेक योजना हे शासन प्रभावीपणे राबवून त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी करत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत करवीर मतदारसंघातील ९३ हजार पेक्षा जास्त महिला लाभार्थी झाल्या आहेत असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. सांगरुळ ता. करवीर येथे विविध विकासकामांचा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

Advertisement

यावेळी बोलताना माजी आमदार नरके म्हणाले, विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या या सरकारच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी लोकप्रतिनिधी नसतानाही या मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपये निधी आणला आहे याकरिता या सरकारचे मी आभार मानतो. तुमच्या पाठबळावरच मी हे करू शकत आहे.भविष्यातील अशाच प्रकारचे पाठबळ द्या सर्वांच्या सहकार्याने मतदार संघ राज्यात आदर्श करूया असे आवाहन केले.

Advertisement

करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सांगरुळ येथे रस्ते सुधारणा जोतिबा मंदीर देवालय सुशोभिकरण, खाटांगळे विठ्ठलाई मंदीर सुशोभिकरण, म्हारुळ, कसबा बीड व बहिरेश्वर येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व आर.सी.सी. गटर्स बांधणे, आरे ते सावरवाडी रस्ता रुंदीकरण, मांडरे व गर्जन येथे समाज मंदीर बांधणे अशी एकूण 4 कोटी 35 लाखांची विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ करवीर तालुक्यातील स्थानिक नेते कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी त्या त्या गांवातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.

Advertisement
Tags :
Mahayuti useful various sections of the society Former MLA Chandradeep Narke
Next Article