Umarga Panchayat Samiti election | धाराशिव उमरग्यात पंचायत समिती सभापती पदासाठी महायुतीत रस्सीखेच
सहा मार्चला ठरणार उमरगा पंचायत समिती सभापती
धाराशिव उमरगा - उमरगा पंचायत समितीच्या सभापती पद महायुतीकडेच असणार आहे. मात्र महायुती अंतर्गत सभापती पदासाठी भाजप - शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कडून सहा मार्च रोजी उमरगा पंचायत समितीचे सभापती निवडीचा कार्यक्रम लागला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून तालुक्याच्या सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून भुसणी गणातून विजयी झालेले कैलास शिंदे तर शिवसेनेकडून केसर जवळगा गणातून आकांक्षा चौगुले सभापती पदासाठी शर्यतीत आहेत. यामध्ये भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील व शिवसेनेकडून माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे प्रतिष्ठान पणाला लागली आहे. सध्या भाजपचे सात, शिवसेनेचे पाच, काँग्रेसचे तीन, ठाकरे शिवसेना एक, अपक्ष एक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक, असे पक्षीय बलाबल आहे. सध्या काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत दिसून येत आहे. बहुमतासाठी दहा चा आकडा कोण गाठणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. भाजपला तीन सदस्याची तर शिवसेनेला पाच वर्षाची गरज आहे.