Kolhapur Municipal Corporation Election : कोल्हापुरात महायुतीने फडकावला विजयाचा भगवा
कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीचा दणदणीत विजय
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने विजयाचा झेंडा फडकवला आहे. इचलकरंजी महापालिकेत भाजप आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. दुसरीकडे एकाकी झुंज देणाऱ्या काँग्रेसला कोल्हापूर महापालिकेत पिछाडीवर यावे लागले आहे.
महायुतीची लाट
कोल्हापूर महापालिकेच्या एकूण ८१ जागांसाठी ३२७ उमेदवार रिंगणात होते. आज सकाळी 10 वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदान मोजण्यात आले, ज्यामध्येच महायुतीचा कल दिसून आला होता. दुपारी दोन वाजेपर्यंत कोल्हापुरात भारतीय जनता पक्ष (20), शिवसेना-शिंदे गट (13) आणि राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट (02) काँग्रेस (19) शिवसेना उबाठा (01) आणि जनसुराज्य (01) असे आकडे हातात आले आहेत. महायुतीच्या या विजयामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयास आली आहेत. विशेषतः भाजपने शहरी भागात आपली ताकद वाढवल्याचे सिद्ध झाले आहे. काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.
इचलकरंजीत भाजपचा डंका
वस्त्रनगरी इचलकरंजी महापालिकेच्या ६५ जागांसाठी २३० उमेदवार नशीब आजमावत होते. इथेही मतदारांनी भाजप प्रणित आघाडीच्या पारड्यात भरभरून मतदान केले आहे. इचलकरंजीत महायुतीने 43 जागांवर बाजी मारत सत्तेकडे एकहाती वाटचाल सुरू केली आहे. ल्या राजकीय आखाड्यात काँग्रेस प्रणित ‘शिवशाहू आघाडी’ने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मतदारांनी नाकारले. शिवशाहू आघाडीला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला. शिंदेगट 3, उबाठा गट 1 आणि अजित पवार गटाला दुपारी 2 वाजेपर्यंत 1 जागा मिळालेली होती.
मतदान आणि चुरस
या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला होता. कोल्हापूर महापालिकेसाठी ६६.५४ टक्के तर इचलकरंजीसाठी ६९.७६ टक्के इतके चुरशीने मतदान झाले होते. कोल्हापुरात दोन टक्के कमी झालेले मतदान आणि इचलकरंजीत वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा रंगली होती. अखेर मतदारांनी स्पष्टपणे सत्ताधारी महायुतीच्या बाजूने कौल दिल्याने स्पष्ट होत आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काही प्रभागांत धक्कादायक निकाल लागले असून, अनेक प्रस्थापित नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे, तर काही ठिकाणी नवख्या चेहऱ्यांनी बाजी मारली आहे.
कोल्हापूर महापालिकेतील प्रमुख विजयी उमेदवार:
१) ऋतुराज क्षीरसागर
२) राजेश लाटकर
३) शारंगधर देशमुख
४) प्रतापसिंह जाधव
५) अजय इंगवले
६) नियाज खान
७) अक्षय जरग
८) सत्यजित जाधव
इचलकरंजी महापालिका - विजयी उमेदवार
भाजप -
प्रभाग ३
डॉ. प्रियांका इंगवले
योगेश चांगदेव पाटील
प्रभाग ४
मोनाली दत्तात्रय मांजरे
मनिषा संतोष कूपटे
मनोज भीमाशंकर हिंगमिरे
प्रभाग ५
सतीश वसंत मुळीक
वैशाली सुनिल पोवार
जुलेखा जहांगीर पटेकरी
प्रभाग ६
अलका अशोक स्वामी
किरण श्रीरंग खवरे
विजया सुनिल महाजन
विठ्ठल पुंडलिक चोपडे
प्रभाग ७
प्रमिला रविंद्र जावळे
प्रभाग ८
रूपा उदय बुगड
प्रभाग ९
रूबन सखाराम आवळे
ध्रुवती सदानंद दळवाई
मनिषा प्रशांत नवनाळे
उदय आनंदा धातुंडे
प्रभाग १०
रवी साहेब रजपुते
विद्या मनोज साळुंखे
तानाजी बाळु पोवार
प्रभाग ११
प्रदीप नामदेव धुत्रे
वैशाली शशिकांत मोहिते
सारिका सुकुमार पाटील
राजु संभाजी बोंद्रे
प्रभाग १२
नितेश किरण पोवार
सुरेखा अजित जाधव
स्नेहल दिपक रावळ
अनिल देवकरण डाळ्या
प्रभाग १३
रूपाली अनंत सातपुते
शशिकला म्हाळसाकांत कवडे
चंद्रकांत विष्णू शेळके
प्रभाग १५
राजू आप्पासो पुजारी
ज्योती नागेश पाटील
तेजश्री अमृत भोसले
संतोष बाबुराव शेळके
प्रभाग १६
पूनम सचिन माळी
सुशांत बाळासाहेब कलागते
अरूणा प्रमोद बचाटे
विजयी उमेदवार -
शिवसेना शिंदे गट
प्रभाग क्रमांक ३
सरिता भाऊसो आवळे
प्रभाग क्रमांक ८
रविंद्र वसंतराव माने
प्रभाग क्रमांक १०
नूतन दिलीप मुथा
विजयी उमेदवार -
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
प्रभाग क्रमांक ३
अशोकराव जांभळे
विजयी उमेदवार -
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग क्रमांक ५
शिवाजी संभाजी पाटील
विजयी उमेदवार -
शिव-शाहू आघाडी
प्रभाग १
स्वाती राजेंद्र लोखंडे
सचिन लालासो राणे
रूपाली नितीन कोकणे
उदयसिंग मारूती पाटील
प्रभाग २
यास्मिन मुसा तासगावे
पद्मा गणेश सावरतकर
रणजीत गंगाराम जाधव
परवेज लतीफ गैबान
प्रभाग ४
सयाजी मारूती चव्हाण
प्रभाग ७
क्रांती अब्राहम आवळे
नंदकुमार आनंदराव पाटील
मदन सिताराम कारंडे
प्रभाग ८
संगीता राजू आलासे
संजय शंकरराव तेलनाडे
प्रभाग १३
अमरजित राजाराम जाधव
प्रभाग १६
स्मिता संजय तेलनाडे
सुनील शंकरराव तेलनाडे