For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या हिंमतीने लढून माझा विजय घडवतील...!- संजय मंडलिक

02:10 PM Apr 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या हिंमतीने लढून माझा विजय घडवतील      संजय मंडलिक
Sanjay Mandalik
Advertisement

दाभिल (आजरा)

‘महायुतीचे कार्यकर्ते लढाऊ आहेत. ते मोठ्या हिंमतीने लढून मंडलिकांचा विजय घडवतील. असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. ते दाभिल (ता. आजरा) येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

Advertisement

उमेदवार संजय मंडलिक म्हणाले, की लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. यामध्ये विकास काय केला व काय करणार आहे, हे सांगितले पाहिजे. ही वैचारिक लढाई असताना गादीचा अपमान केल्याचा कांगावा कशाला?. महायुतीला जिह्यातून दिवसेदिवस मिळणारा वाढता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता आपला विजय निश्चित आहे. या विजयासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे नेते आपापल्या पातळीवर काम करीत असून सर्वच कार्यकर्त्याची मोठी ताकद माझ्या मागे उभी आहे. हेच सर्व कार्यकर्ते धनुष्यबाण चिन्ह घराघरात पोहचवून मोठ्या मताधिक्याचा विजय मिळवून देतील. असा ठाम विश्वास व्यक्त केला.

देशाच्या विकासासाठी मोदींना साथ द्या. - मुश्रीफ
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसला जे जमले नाही, ते पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षात करून दाखवले. मुद्रा लोन, स्टार्टअप योजना, किसान सन्मान निधी यासारख्या योजना सर्वसामान्यांना दिल्या. त्याचबरोबर देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा उंचावली. देशाला विकासाच्या दिशेने नेण्याकरिता पुन्हा एक वेळ पंतप्रधान मोदी यांना संधी देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. असे आवाहनही. त्यांनी केले.

Advertisement

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील यांचीही मनोगती झाली. के. डी. सी. सी. संचालक सुधीर देसाई, आजरा कारखाना चेअरमन वंसतराव धुरे, व्हा. चेअरमन एम. के. देसाई, विठ्ठलराव देसाई, सरपंच युवराज पाटील, शिरीष देसाई, एम.के. देसाई, अनिल फडके, मारुती घोरपडे, विठ्ठलराव देसाई, राजू मुरकुटे, संभाजी तांबेकर, दीपक देसाई, संभाजीराव पाटील, शिवाजी नांदवडेकर, मधुकर यलगार, सुभाष देसाई, दौलती पाटील, रवींद्र होडगे, सुरेश होडगे, आदिल फरास कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांना मतपेटीतून उत्तर द्या...!
काही मंडळी ‘आमच ठरलय ‘ कोल्हापूरचं ठरलंय... गादीचा मान- अवमान यासह विविध प्रकारची दिशाभूल करणारी विधाने करत आहेत. अशा मंडळींना भावनिक न होता मतपेटीतून योग्य ते उत्तर द्या. असे. आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी केले.

Advertisement
Tags :

.