लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने पुन्हा महायुतीचे सरकार येणार - दत्ता सामंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होणार
भाऊबीज उत्सवाच्या निमित्ताने शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण | प्रतिनिधी : सर्व लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा गतिमान विकासाचे व सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे महायुतीचे सरकार येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही लोकप्रिय उमेदवार मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होतील. असा ठाम विश्वास भाऊबीज उत्सवाच्या निमित्ताने शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात मागील तीन वर्षात महायुती सरकारने गतिमान विकासासोबत अनेक जनहिताच्या योजना आणल्या. शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार व युवा वर्गासाठी अनेक महत्वकांक्षी निर्णय घेतले. महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घराघरात पोहचली. माता, भगिनी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व महायुती सरकारचे आभार व्यक्त होत आहेत. समाधान व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे हे यश आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचा आशीर्वाद व मायबाप जनतेच्या पाठिंब्यावर महायुतीचे सरकार पुन्हा येणार. सुरु असलेल्या जनहिताच्या योजना आणखी वाढतील. लाडकी बहीण योजनेतही लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच वाढ करतील असा विश्वासही शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.