For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Result | राज्यातील नगरपालिका निवडणुकांत महायुतीचा दबदबा

04:20 PM Dec 21, 2025 IST | NEETA POTDAR
maharashtra nagar palika nagar panchayat result   राज्यातील नगरपालिका निवडणुकांत महायुतीचा दबदबा
Advertisement

                             राज्यात महायुतीला मोठे यश; महाविकास आघाडी पिछाडीवर

Advertisement

मुंबई : राज्यात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचा वरचष्मा राहिला. 288 पैकी 214 नगरपालिकांमध्ये महायुतीला सत्ता मिळाली. तर महाविकास आघाडीला 49 आणि 25 ठिकाणी स्थानिक आघाड्यांना यश मिळाले.

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यात झाल्या. 2 डिसेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत 264 नगरपालिकांसाठी 2 डिसेंबरला मतदान झाले. तर 24 नगरपालिकांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रीया पूर्ण झाली. यानंतर आज रविवार 21 रोजी सर्व 288 नगरपालिका आणि नगरपंचातींच्या मतमोजणीस सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. दोन तासात निकालाचे चित्र स्पष्ट झाले. यामध्ये महायुतीने एकहाती वर्चस्व मिळविले.

Advertisement

महायुतीची 214 नगरपालिकांमध्ये सत्ता

महायुतीने 214 नगरपालिकांमध्ये सत्ता मिळविली. यामध्ये भाजपने सर्वाधिक 119 ठिकाणी विजय मिळविला. तर 59 नगरपालिकांच्या चाव्या शिंदेगटाच्या हातामध्ये आल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाने 36 नगरपालिका,नगरपंचायतींमध्ये विजय मिळविला.

 महाविकास 49 ठिकाणी विजयी

महाविकास आघाडीची नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्येही निराशा झाली. 49 ठिकाणी मविआला विजय मिळाला. यामध्ये काँग्रेसला 32 नगरपालिकामध्ये सत्ता मिळाली. तर शिवसेना ठाकरे गटाला 9 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 ठिकाणी यश मिळाले.

स्थानिक आघाड्यांची 25 ठिकाणी बाजी

राज्यातील अनेक नगरपालिका, नगरपंचायतमध्ये स्थानिक आघाड्यांनीही शड्डू ठोकला होता. स्थानिक आघाड्यांनी प्रतिस्पर्धांवर मात करत 25 नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये बाजी मारल्याचे पहावयास मिळाले.

Advertisement
Tags :

.