For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Election Result 2025 : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व; 13 पैकी 11 नगराध्यक्ष महायुतीचे

04:06 PM Dec 21, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur election result 2025   कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व  13 पैकी 11 नगराध्यक्ष महायुतीचे
Advertisement

                         कोल्हापूर जिल्हा नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय

Advertisement

कोल्हापूर : नगर पालिका, नगरपंचायत निवडणुकीत जिल्ल्यातील नगराध्यक्ष पदाच्या १३ जागांपैकी ११ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये शिवसेना शिंदेगटाचे सर्वाधिक चार नगराध्यक्ष निवडूण आले आहेत. तर भाजप तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष झाले आहेत. तर काँग्रेसला पेठवडगांव आणि शिरोळ नगरपालिकेत यश मिळाले आहे

जिल्ह्यात विधानसभा निवडणुक पाठोपाठ नगरपालिका निवडणुकीतही महायुतीला मोठे यश मिळाले. १० नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. जिल्ह्यात एकूण ७८.८७ टक्के मतदान झाले होते. यानंतर आज रविवार २१ रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. तासाभरता निकालाचे चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यात महायुतीने घवघवीत यश मिळविले.

Advertisement

शिवसेना शिंदे गटाचे चार नगराध्यक्ष
जिल्हयात शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक चार नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये मुरगूड, हातकणंगले, जयसिंगपूर, कुरुंदवाड या चार नगरपालिकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले. कुरुंदवाडमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहु विकास आघाडीने १२ जागांवर तर काँग्रेसने आठ जागांवर विजय मिळविला. हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदेगटाने ६ जागांवर तर काँग्रेस ५. भाजप २. ठाकरे गट १ आणि अपक्ष चार उमेदवार विजयी झाले.

मुरगुड मध्ये शिवसेनेने १३. भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रत्येके तीन आणि समरजित घाटगे गटाने एका जागेवर विजय मिळविला. जयसिंगपूर नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर पुरस्कृत राजर्षी शाहू आघाडीचे २२ उमेदवार विजयी झाले तर विरोधी शिरोळ तालुका विकास आघडीने पाच जागांवर यश मिळविले. तर एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली प्रत्येकी२ जागा आणि अपक्ष उमेदवारांनी चार जागांवर विजय मिळविला. मलकापूर नगरपंचायतमध्ये जनसुराज्य शक्तीपक्षाने ११ भाजप १ ठाकरे गट ७ अपक्ष एका जागेवर विजय मिळविला.

काँग्रेसला पेठवडगांव, शिरोळमध्ये यश
काँग्रेसने केवळ दोन जागांवर यश मिळविले. पेठवडगांव आणि शिरोळ नगरपालिकेत काँग्रेसने सत्ता मिळविली. पेठवडगांवमध्ये कांग्रेस पुरस्कृत यादव आघडीने १५ जागांवर विजय मिळविला तर विरोधी जनसुराज्य, ताराराणी आणि युवक क्रांती आघाडीने पाच जागांवर यश मिळविले. शिरोळमध्ये काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पृथ्वीराज यादव आघाडीचे नगराध्यक्ष पदासह १५ उमेदवार विजयी झाले. तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीचे तीन आणि दोन
अपक्ष उमेदवार विजयी झाले.

विजेते उमेदवार

मुरगुद्ध : सुहासिनीदेवी पाटील (शिवसेना शिंदे)
हातकणंगले: अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे)
कुरुंदवाड: मनिषा डांगे (शिवसेना पुरस्कृत यड्रावकर गट)
जयसिंगपूर: संजय पाटील यड्रावकर (शिवसेना यड्रावकर गट)
हुपरी: मंगलराव माळगे (भाजप)
चंदगड : सुनिल काणेकर (भाजप)
आजरा : अशोक चराटी (भाजपा पुरस्कृत ताराराणी आघाडी)
शिरोळ : योगिता कांबळे (कांग्रेस पुरस्कृत आघाडी)
पेठ वडगांव : विद्याताई पोळ (कांग्रेस पुरस्कृत, यादव आघाडी)
कागल सविता माने (राष्ट्रवादी अजित पवार)
गडहिंग्लज : महेश तुरबतमठ (राष्ट्रवादी अजित पवार)
मलकापूर : रश्मी कोठावळे (जनसुराज्य)
पन्हाळा : जयश्री पवार (जनसुराज्य)

Advertisement
Tags :

.