For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीचे वर्चस्व, विजयाच्या जल्लोषात शहर दणाणले

08:00 PM Jan 16, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापुरात महायुतीचे वर्चस्व  विजयाच्या जल्लोषात शहर दणाणले
Advertisement

                             महायुतीच्या विजयाने कोल्हापुरात उत्साहाचे वातावरण

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीत महायुतीने आपले अधिक जागा मिळवत वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे, विजयी उमेदवारांच्या घोषणांनी आणि समर्थकांच्या जल्लोषाने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी जल्लोषी मिरवणुका काढत आपला आनंद व्यक्त केला. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचे गजर, सिस्टीमवरील गाणी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तरुणाई बेधुंद झाली होती.
मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्ते आकडेवारी घेत विजयी झाल्याचा आनंद घेत होते. तर मतमोजणी ठिकाणच्चा संदेश बघून कार्यकर्ते आपल्या प्रभागात जल्लोष करत होते. गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी, गोड पेढा ऐकमेकांना भरवत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला.

नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात विजयाचा जल्लोष केला. त्यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांनी या निवडणूकीत विजय मिळविल्याने शनिवार पेठेतील कार्यालयात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. उमेदवारांच्या कार्यालयात गुलालाची उधळण विजयी उमेदवारांच्या कार्यालयांमध्ये समर्थक व मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाजप-शिवसेना महायुतीच्या विविध कार्यालयांमध्ये एकमेकांना मिठाई भरवत्, फटाके फोडत आणि जल्लोष करत विजय साजरा करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी मोटर सायकलवरून फेरफटका मारत विजयाचा आनंद लुटला

Advertisement

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जल्लोष

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठेतील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीने आणि जल्लोषाच्या आवाजाने संपूर्ण शनिवार पेठ परिसर दणाणून गेला होता. या निवडणुकीत पहिल्यांदाच आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर हे महापालिकेत निवडून आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. हा विजय राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात असून, राज्यभर या निवडणुकीची चर्चा रंगली होती.

दरम्यान, सोशल मीडियावर 'हिरो' ठरलेले विजय साळुंखे यांनी प्रचारादरम्यान सोशल मीडियावर मोठा प्रभाव निर्माण केला होता. मात्र प्रत्यक्ष निवडणूक निकालात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष मतदानातील वास्तव यातील फरक यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे
भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष भाजपच्या काही नुतन नगरसेवकांनी भाजपच्या नागाळा पार्क येथील पक्ष कार्यालयात येउन भेट दिली. विजयाचा पेढा कार्यालयात देउन प्रभागात आगमण केले. महायुतीच्या विजयामुळे कोल्हापूर शहरात उत्साह, आनंद आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत हा आनंद साजरा केला.

Advertisement
Tags :

.