For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महायुतीच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद...वाठार ते शिरोली मोटर सायकल रॅली

03:24 PM May 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
महायुतीच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद   वाठार ते शिरोली मोटर सायकल रॅली
MP Dathisheel Mane
Advertisement

महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंच्या विजयाचा निर्धार

वडगांव / प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खास . धैर्यशिल माने यांच्या प्रचारार्थ मोटर सायकल रॅली काढण्यात आली . रॅलीत मोठ्या संख्येने युवावर्ग दुचाकीसह सहभागी झाला होता. रॅलीस वाठार तर्फे वडगांव येथुन सुरुवात होवुन किणी , भादोले, वडगाव शहरातुन, संभापुर , टोप मार्गे शिरोली येथे रॅलीची सांगता झाली. प्रत्येक गावातील मुख्य मार्गावरून रॅली मार्गस्थ होत होती.

Advertisement

यावेळी खास. धैर्यशील माने यांनी वडगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गटनेत्या प्रविता सालपे , वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, डॉ. अशोक चौगुले, डॉ. मिलिंद हिरवे, यांच्यासह वडगाव नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते . रॅलीमध्ये खास. माने यांना प्रत्येक गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जात होता . तसेच मुख्य रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती . यावेळी प्रत्येक गावातील सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायतीचे आजी - माजी सदस्य सदस्यांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

मांगले / प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खास . धैर्यशिल माने यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रा मांगले, सागावसह अन्य गावातून काढण्यात आली. यावेळी खास. माने यांचे जंगी स्वागत करून महिलांनी औक्षण केले . तसेच काही गावात पुष्पवृष्टी करण्यात आली . यावेळी नागरिकांतून खास. माने यांना पाठिंबा पाठिंबा देण्यात येत होता. पदयात्रेत सत्यजित देशमुख , सम्राट महाडिक, विजय पाटील , महेश पाटील, नितीन दिवे, धनाजी नरोटे, उत्तम गावडे, सागर कुंभार, किशोर पाटील, सत्यम पाटील , यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदयात्रा संपन्न झाली.

Advertisement

Advertisement
Tags :

.