For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिंदर पंचायत समिती मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

04:07 PM Jan 30, 2026 IST | अनुजा कुडतरकर
चिंदर पंचायत समिती मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
Advertisement

आचरा जि. प साठी वर्षा सांबारी व चिंदर पं स. साठी दिपक सुर्वे आहेत अधिकृत उमेदवार

Advertisement

आचरा प्रतिनिधी

आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील शिंदे सेनेचे उमेदवार वर्षा मांगरीश सांबारी व चिंदर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिपक भागोजी सुर्वे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा महायुतीच्या वतीने चिंदर भगवती माऊली मंदिर येथून भगवती माऊलीला साकडे घालून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर श्री देव रामेश्वर चिंदर, श्री जयंती देवी पळसंब, श्री गणेश मंदिर कोईळ, श्री पावणाई देवी बांदिवडे, श्री देव रामेश्वर त्रिंबक, श्री ब्राह्मण देव, श्री सातेरी देवी, श्री पावणाई देवी त्रिंबक या ग्रामदेवता यांच्या मंदिरात जाऊन उमेदवार, कार्यकर्ते, नेते यांनी आशिर्वाद घेतला.

Advertisement

चिंदर पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात विकास साधणार

यावेळी महायुतीचे चिंदर पंचायत समितीचे उमेदवार दिपक सुर्वे म्हणाले की चिंदर पंचायत समितीची निवडणूक लढवित आहे. मला भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली असून कमळ या निवडणूक चिन्हावर आपल्या सर्वांच्या विश्वासावर मी ही निवडणूक लढवित आहे. गेली ३० वर्षे मी सामाजकारण ते राजकारण अशा प्रकारे समाजाची सेवा करत आहे सर्व-सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्यामुळे मला सर्व-सामान्यांच्या प्रश्नाची जान आहे. मी या पुर्वी चिंदर ग्राम पंचायत सदस्य, चिंदर उपसरपंच, ज्ञानदिप विद्यालय वायंगणी संचालक, स्वामी समर्थ मठ वायंगणी उपाध्यक्ष अशा प्रकारच्या अनेक सेवाभावी संस्थेवर काम केले आहे व त्यामधुन सर्व-सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात अनेक लोकांना जाप्रकारे मदत केली ते सर्व श्रृत आहे. त्यामुळे माझा कदाचित कोरोना योध्दा म्हणून यथोचित सन्मान करण्यात आला. पंचायत समिती प्रभागाच्या विकासासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावली आहेत तसेच, अनेक आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रक्तदान शिबीर अशी अनेक लोक उपयोगी कामामध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. मला लहानपणापासून समाज सेवेची आवड असल्यामुळे मी अनेक तरुण वर्गासाठी क्रीकेट, हॉलिबॉल अशा विविध स्पर्धेमधून नेहमीच युवकांचे प्रतिनिधीत्व केले आहे व त्यांना प्रोसाहन देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहीलो आहे. महिला बचत गट सक्षम होण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी कायम प्रयत्नशीर राहीलो आहे.मला राजकीय क्षेत्राचा परिपुर्ण अनुभव असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार मा. नारायणराव राणेसाहेब, प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाणसाहेब, पालकमंत्री मा. नितेशजी राणेसाहेब, आम. निलेशजी राणेसाहेब, जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष श्री. धोंडू चिंदरकर या सर्व नेत्यांच्या सहकार्यातून चिंदर पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात शिक्षण, आरोग्य, क्रिडा, वीज, पाणी, रस्ते अशा विकास कामांना योग्य न्याय देण्याचा परिपुर्ण प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.यावेळी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश राणे, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, शिवसेना तालुका चिटणीस चंद्रकांत गोलतकर, विभाग प्रमुख संतोष कोदे, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, किशोर त्रिंबककर, अशोक बागवे, जेरोन फर्नांडिस, संतोष मिराशी, बाबू परुळेकर, दक्षता सुर्वे, शेखर सुतार, एकनाथ घाडी, संतोष गांवकर, संतोष अपराज, रवि घागरे, दिलीप कावले, मांगरीश सांबारी, प्रफुल्ल प्रभू, सागर अपराज, दिगंबर जाधव, दत्ता वराडकर, भाऊ हडकर, शेखर पालकर, शिशिर पालकर, पुरुषोत्तम परब, राजु त्रिंबककर, दिपक सावंत, अमोल साटम, शाहुलखन बांदिवडेकर, सचिन हडकर,सागर परुळेकर, बाळू माळकर, दिगंबर जाधव, गुरु कांबळी महिला वर्ग आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.