For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उघड्या अवस्थेतील फिडर पिलरकडे महावितरणचे दुर्लक्ष

03:18 PM Jan 30, 2026 IST | अनुजा कुडतरकर
उघड्या अवस्थेतील फिडर पिलरकडे महावितरणचे दुर्लक्ष
Advertisement

नगरसेवक सूर्याजींचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

बाजारपेठेतील संचयनी पॅलेसच्या मागील बाजूस असलेला महावितरणचा फिडर पिलर उघडा पडला असून महावितरणचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिक, लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात महावितरणने हि परिस्थिती बदलावी अन्यथा, महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.श्री. सुर्याजी म्हणाले, महावितरणचे बाजारपेठेतील भागाकडे देखील लक्ष नाही. संचयनी पॅलेसच्या येथे नागरिक राहतात, लहान मुलं खेळतात. इथला फिडर पिलर उघडा असून धोकादायक झाला आहे. यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती बघता जीव गेल्यानंतर महावितरण प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल त्यांनी केला. तर, एकीकडे पालकमंत्री नितेश राणे व माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर मागणी केल्यानंतर निधी उपलब्ध करून देतात. मात्र,अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. कादरी मशिद येथील स्ट्रीट लाईटचा बॉक्स देखील अनेक महिने उघडा पडला होता. इशारा दिल्यानंतर तो बदलण्यात आला.‌ त्यामुळे शहरात वस्तीच्या ठिकाणी असलेले उघडे असणारे ट्रान्स्फॉर्मर, फिडर पिलर चार दिवसांत बदलले न गेल्यास महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.‌

Advertisement

Advertisement
Tags :

.