सावंतवाडीत महावितरणकडून पावसाळ्यापूर्वीची कामे हाती
सावंतवाडी : प्रतिनिधी
पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीकडून झाडी -झुडपे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून बुधवारी सकाळपासून सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा जुस्तीननगर , गावडे शेत आदी भागात वीज तारांना बिलगलेली झाडी कुडाळ येथून मागवलेल्या जेसीबीच्या साहाय्याने तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते .यावेळी वीज वितरणचे वायरमन वैभव परब व सचिन धोंड आदी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली सदर झाडी तोडण्यात आली. दरम्यान , नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर तात्काळ त्याची अंमलबजावणी वीज वितरणने केली असून या कामामुळे आज सकाळपासूनच दुपारपर्यंत शहरातील काही भागात वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे अनेक नागरिकांनी वीज वितरणच्या कार्यालयात धाव घेत विचारणा केली मात्र ,पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे त्यामुळे काही वीस पुरवठा खंडित राहणार आहे असे सुचित केले.