Prakash Abitkar: स्मार्ट मीटरसाठी सक्ती नको, MSEDCL जनता दरबारात सेवेबाबत तक्रारींचा पाढा
स्मार्ट मीटरच्या नावाखाली दादगिरी सुरू असल्याचा आरोपही झाला
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी सभागृहात झालेल्या महावितरणच्या जनतादरबारात वीज ग्राहकांकडून महावितरणच्या सेवेबद्दल तक्रारींचा पाढा वाचत अधिकाऱ्यांसमोर अक्षरश: प्रश्नाचा भडिमार केला. स्मार्ट मीटरच्या नावाखाली दादगिरी सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.
सौर उर्जा प्रकल्पातील त्रुटीही निदर्शनास आणल्या. यावेळी काही ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेतली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विविध विभागाशी संबंधित जनता दरबाराचे आयोजन केले जाते.
पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महावितरणचा जनता दरबार झाला. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे यांची उपस्थिती होती. शिरोळमधील वीज ग्राहकाने सौर पंप चालत नसल्याचे निदर्शनास आणले. पारंपरिक वीज कनेक्शनच मिळावे.
साडेसात एचपीची वीज माफ सरसकट करावी. यावर पालकमंत्री आबिटकर यांनी सौर पंपावरील वीज योजनेतील अडथळ्याबाबत सर्व्हे करण्यात आला. 9900 ग्राहक सौर योजना प्रकल्पासाठी पात्र आहेत. सौर उर्जाची दुर्गम भागात, पूरबाधित क्षेत्रात मोटरसाठी पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही, हे वास्तव आहे.
यासंदर्भात असणाऱ्या त्रुटी दुरू करण्यासाठी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. नियमात बदल करण्यायासंदर्भातील प्रस्ताव करून राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असे स्पष्ट केले. शेतामध्ये राहणाऱ्या ग्राहकांची महावितरणकडून वीज कनेक्शन बंद केली असल्याची तक्रार इस्पुर्लीतील एका ग्राहकांने मांडली. सिंगल फेजही येथील बंद केल्याचे सांगितले.
यावर महावितरणकडून याचा खुलासा करण्यात आला. प्रशासनाकडून चुकीची माहिती दिली जात आहे. कार्यालयात गेल्यानंतर अधिकाऱ्यांची भूमिका वेगळी असते. उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले. स्मार्ट मीटरसाठी सक्ती नको स्मार्ट मीटरला विरोध आहे.
ग्राहकांना विचारात घेतले जात नाही. ज्यांची मागणी असेल त्यांना स्मार्ट मीटर बसावे. स्मार्ट मीटरबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. बिल कमी होत नसून वाढत आहेत. ज्यांची मीटर खराब झाले असेल त्यांची महावितरणकडून मोफत मीटर बसवून दिली पाहिजे. परंतू महावितरणचे कर्मचारी पैशाची मागणी करत असल्याचेही निदर्शनास आणले.
व्याज, दंडात शेती विकण्याची वेळ साडेसात एचपीची मोटर असताना बील दहा एचपीनुसार दिली जात असल्याचेही एका ग्राहकांने यावेळी निदर्शनास आणले. व्याज, दंड व्याजामध्ये शेती विकण्याची वेळ आल्याचेही शेतकऱ्यानी सांगितले. पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ एक जेष्ठ नागरीकाने महावितरणकडून होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठविला.
यावेळी दुसऱ्यांनाही बोलण्याची संधी द्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीही त्यांच्याकडून मागण्या मांडत असताना पोलिसाने त्यांना खुर्चीवर बसविले. वीज चोरीचा फटका वीज चोरी मोठया प्रमाणात होत असून याचा भार प्रामिणक बील भरणाऱ्यांवर बसत आहे. पुरेशा क्षमतेने वीज मिळत नसल्याने मोटर सुरू होत नसल्याचे करवीरमधील नंदगाव येथील ग्राहकाने प्रशासनाच्या निदर्शनास आणले.
तक्रारींसाठी झुंबड महावितरण कंपनीच्या तक्रारी संदर्भातील जनता दरबारात नागरिकांनी शाहू सभागृहात गर्दी केली होती. व्यासपीठावर पालकमंत्र्यांकडे तक्रार सांगण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाला r हो ती .यावे ळा r काहीकाळ गदारोळही झाला.
महावितरणची दादागिरी थांबवा महावितरणकडून साडेसात एचपीवरील मोटर असणाऱ्या शेतकऱ्यांची कनेक्शन तोडण्याबाबत नोटीस काढली आहे. या निर्णयाला ताबडतोब स्थगित देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही वीज ग्राहकांनी पालकमंत्र्यांकडे केली. स्मार्ट मीटरबाबतही महावितरण कंपनीची दादागिरी सुरू असून ती थांबवण्याची मागणी करण्यात आली.