महावीर कॉलेज चौक रस्ता ठरतोय धोकादायक
कोल्हापूर / अवधुत शिंदे :
नागाळा पार्क ते महाविर कॉलेज परिसरातील रोड धोकादायक बनत चालला आहे. या ठिकाणी शाळा, कॉलेजस आहेत त्यामुळे या रोडवर दररोज विद्यार्थ्यांची वर्दळ असते. येथे न्यु पॅलेस पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. हा रस्ता शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्वाचा रस्ता आहे. या परिसरात महाविर कॉलेज, शाळा, न्यु पॅलेस, हॉस्पीटल अशी महत्वाची ठिकाणे आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत येथे गर्दीचे प्रमाण जास्त असते. महाविद्यालय सुरु होण्याच्या वेळेत येथे गर्दी जास्त पाहयला मिळते
- तीन रस्त्यांचा संगम
या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात नागाळा पार्क, न्यु पॅलेसकडे जाणारा आणि महाविर गार्डनकडून येणारा रस्ता या तीनी मार्गावरुन येणाऱ्या वाहणचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. यामुळे अपघात होण्याचे प्रकार वाढत आहे.
गेल्या काही महिन्यामध्ये या ठिकाणी दुचाकी स्वार आणि चारचाकी वाहनांमध्ये लहान मोठे अपघात झाल्याचे दिसून आले आहे. काही अपघातांमध्ये विद्यार्थीही जखमी झाल्याच्या घटना आहेत.
- वेगावान वाहने आणि अरुंद रस्ता
या मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहणांची वर्दळ वाढली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहतूकीचा वेग वाढला आहे. या वाढत्या वाहतूकीने महाविर महाविद्यालय व न्यू पॅलेस कडे टर्न घेणे धोकादायक झाले आहे.
- सायं 6 ते रात्री 9 पर्यंत कोंडी
सायंकाळी कॉलेज, शाळेतील विद्यार्थ्यांची व कामावरुन जाणाऱ्यांची संख्या जास्त प्रामणामध्ये असल्याने या भागात गेंधळ उडतो. वाहतूक धीम्या गतीने चालते आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
- वाहनांची चुकीच्या पध्दतीने पार्किंग
नागाळा पार्क ते महाविर महाविद्यालय या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला नियमीत गाड्या उभ्या केल्या असतात. या गाड्या चुकीच्या पध्दतीने लावल्याने वाहतूकीस अथळा निर्माण होतो. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होते.
या मार्गावर दिवसेंदिवस वाहणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मोठा झाला आहे. सकाळी दहा ते बारा व सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत या रस्त्यावर वाहणांची संख्या जास्त असते त्यामुळे वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. तसेच या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. तरी प्रशासनाने यावर वेळीच तोडगा काडण्याची गरज आहे
-शरद शिंदे, रहिवासी