हातकणंगले मतदारसंघात 'महाविकास'चा उमेदवार देणार; 'वंचित'बाबत ही निर्णय लवकरच...! जयंत पाटलांचा खुलासा
राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीचा पाठींबा न घेतल्यास तिथे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची घोषणा महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेत वंचित बहूजन आघाडीबाबतही दोन दिवसात निर्णय होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
पहा VIDEO>>> हातकणंगले मतदारसंघात 'महाविकास'चा उमेदवार देणार; जयंत पाटलांचा खुलासा
आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी हातकणंगले मतदारसंघामध्ये उमेदवार देण्याच्या तयारी असून राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना जर महाविकास आघाडीला पाठींबा देणार नसेल तर तिथे नक्कीच उमेदवारी दिला जाईल असं म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या राजकिय घडामोडी पहाता महाराष्ट्रातील सगळ्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी उमेदवार देण्याची तयारी करत असल्याचं म्हटले आह. तसेच वंचित बाबतही दोन दिवसात निर्णय होऊन जागावाटपामध्ये स्पष्टता येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
सांगलीतील राजकिय पेचावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी सांगलीत शिवसेनेने उमेदवार जाहीर केला असला तरीही यातून काही तोडगा निघतो का यावर चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे. 45 प्लस या भाजपच्या नाऱ्याचीही जयंत पाटील यांनी खिल्ली उडवताना कोल्हापूर आणि साताऱ्याच्या दोन्ही जागा कमी होत असतील तर मग कसला 45 प्लसच दावा. जानकरना माढा जागा देण्याचे आश्वासन पवार साहेबांनी दिले होते. मात्र ते महायुती सोबत गेले. माढा मध्ये आता नवीन उमेदवार शोधावा लागेल." असेही त्यांनी म्हटले आहे.