Sangli Politics : सांगली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा मास्टर प्लान जोरात
महाविकास आघाडीत एकता; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
सांगली : महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली महाविकास आघाडी एक मास्टर प्लान घेऊन आपली बिजयी घौडदौड करत आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये काहीच घडामोड होत नसल्याने भाजपचा मात्र टांगा पलटी घोडे फरार अशी अवस्थाझाली आहे अशी टीका निवडणूक प्रचार प्रमुख शेखर माने यांनी केली आहे.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकांच्या घोषणेपासून महाविकास आघाडीने प्रचाराचा जो वेग पकडला आहे तो आजपर्यंत कायम आहे. सर्वात आधी महाविकास आघाडीने आघाडीची घोषणा केली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला त्यानंतर एकत्र इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यामुळे महाविकास आघाडीत एकी दिसली.इतकेच नाही तर प्रत्यक्ष प्रचारातही सर्वसहकायांमध्ये समन्वय दिसून येत आहे. माजी मंत्री जयंतराव पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील हे दिवसाला सहा, सहा सभा घेत आहेत. त्यासह मॉर्निंग वॉक दरम्यान मतदारांशी संवाद साधणे, डोअर टू डोअर प्रचार, रोड शो यांकडेही बारीक लक्ष दिले जात आहे.
जयंतराव पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा मास्टर प्लान जोरदार सुरू असून या प्लान मुळे महाविकास
आघाडीरला एक बुस्टर डोस मिळाला आहे अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. असेही माने म्हणाले.
दरम्यान भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेनंतर कुठलीच हालचाल दिसली नाही. कुठे सभा नाही, तर कुठे रोड शो नाही यामुळे भाजपचा मात्र टांगा पलटी घोडे फरार अशी अवस्था झाला असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे आणि ही खुले सत्य असल्यामुळे त्याला भाजप नाकारू शकत नाही असे शेखर माने म्हणाले.