Kolhapur Municipal Corporation Election Results : महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, कोल्हापुरात चुरशीचा निकाल
कोल्हापुरात काँग्रेस मोठा भाऊ
कोल्हापुर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या चुरशीची लढाईत अखेर महायुतीने बाजी मारली आहे.. महायुतीने बाजी जरी मारली असेल तरीही महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे.
कोल्हापूरमध्ये महायुतीविरुद्ध काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यात थेट लढत होती. मात्र,आमदार सतेज पाटील यांनी एकहाती तब्बल 37 जागा निवडून आणल्या तर शिवसेना ठाकरे गटाला केवळ एक जागा मिळाल्याने केवळ तीन जागांमुळे कोल्हापूरची महापालिका सतेज पाटील यांच्या हातून निसटली आहे.
महाविकास आघाडीमध्ये कोल्हापुरात काँग्रेस सर्वात मोठा भाऊ ठरला आहे.. काँग्रेसच्या खात्यामध्ये 37 जागा निवडून आल्या आहेत तर शिवसेना ठाकरे गटाला केवळ एक जागा मिळाली आहे.. तर कोल्हापूर निवडणुकीमध्ये ही कॉँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे.. काँग्रेस 37 जागा भाजपच्या खात्यामध्ये 24 जागा आहेत. शिवसेना शिंदे गट 14 जागांवर राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. जनसुराज्यने एक जागा जिंकली आहे . तर शरद पवार पक्षाची एकही जागा निवडून न आल्यामुळे कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र निराशेला सामोरे जावे लागले आहे.
मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांचा जोरदार प्रचार
महायुतीच्या प्रचारामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी उतरले होते. तरीही सतेज पाटील यांच्या काँग्रेसने महानगरपालिका निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे.काँग्रेसने 81 पैकी 75 जागांवर उमेदवार होते. यामध्ये काँग्रेसचे 37 उमेदवार विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाचा केवळ एक उमेदवार विजयी झाला.
दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा भाऊ ठरला भाजपला 24 जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाला 14 जागा मिळाल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिडोर्ले जे काँग्रेसकडून पुरस्कृत होते ते सुद्धा पराभूत झाले.
कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'
सतेज पाटील यांनी रस्त्यावर उतरून प्रचाराची धुरा सांभाळली होती. 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं' त्या पद्धतीने कॅम्पेन राबवण्यास सुरुवात केली होती. यानंतर पाटील यांच्या कॅम्पेनमागून महायुती जाताना दिसून आली.
पाटील रस्त्यावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरात प्रचाराला यावं लागलं. कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'या टॅगलाईनवर महायुतीच्या बड्या नेत्यानी टीका देखील केली होती