महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक!

03:41 PM Dec 02, 2023 IST | Abhijeet Khandekar
Dr. Chetan Narake
Advertisement

जनतेची भावना असल्याची डॉ. चेतन नरके यांची स्पष्टोक्ती; महाविकास आघाडीकडून लोकसभा लढविण्यास इच्छुक

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून निवडणुक लढण्यास इच्छुक आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात अभ्यास दौरा करत सर्व गावांना भेटी देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्या तत्काळ सोडविणे शक्य आहे, त्या सोडविल्याही आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी मी 'रिचेबल' उमेदवार असल्याची भावना जनतेमध्ये असल्याची स्पष्टोक्ती गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी दिली.

Advertisement

पहा VIDEO >>> कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक!

Advertisement

थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती देण्यासाठी डॉ. नरके यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यानंतर त्यांना अगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता, त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे सांगत लवकरच उमेदवारीबाबत निर्णय होईल असेही सांगितले.

डॉ. नरके म्हणाले, महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहे. यासाठी गेल्या दोन वर्षात मतदारसंघातील प्रत्येक गावाचा अभ्यास दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर गोकुळच्या संपर्क दौऱ्यातूनही जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही राजकीय पक्षात नसतानाही चंदगडसाठी काजू बोर्ड मंजूर करुन आणला. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन गाय, म्हैस खेरीदसाठी वाढीव अनुदान योजनेत कोल्हापूरसह अन्य पाच जिल्ह्यांचा समावेश करुन घेतला. त्याचबरोबर अन्य ज्या काही समस्या तत्काळ मार्गी लावणे शक्य आहे, त्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केल्याचे डॉ. नरके यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवाराबाबत लवकरच निर्णय होईल. यापुर्वी मी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या वरिष्ठांची व्यक्तीगत भेट घेतली आहे. त्यांना जिल्ह्यात राबविलेले उपक्रम पुढील काळासाठीचा अजेंडा याबाबत माहिती दिली आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते व जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रमुख नेते कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार ठरवतील. त्यांच्यकडून सकारात्मक प्रतिसाद असल्याचे सांगत डॉ. नरके यांनी उमेदवारीबाबत अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिला.

कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत बोलताना डॉ. नरके यांनी अद्याप आपण कोणत्याच पक्षात प्रवेश केला नसल्याचे सांगितले. पण महाविकास आघाडीकडून निवडणुक लढवायची आहे. त्यासाठी शिवसेना- ठाकरे गट, राष्ट्रवादी- शरद पवार गट, व काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठांकडून जो आदेश येईळ त्यानुसार माझा आगामी काळातील राजकिय निर्णय असेल. असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
Dr. Chetan NarakeDr. Conscious NarakekolhapurLok Sabha ConstituencyMahavikas Aghadi
Next Article