महाविकास आघाडीचं अस्तित्व राहील का नाही हा प्रश्न...मात्र सोबत जाण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार : प्रकाश आंबेडकर
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये अजूनही मतभेद असल्याचा दावा करून महाविकास आघाडीचं अस्तित्व राहील का नाही हा प्रश्न असल्याचं सांगून आघाडीबरोबर आपली बातचीत फिस्कटल्यास आमच्याशी युती करण्यास इच्छुक असलेल्यांशी जाण्यासाठी आम्ही तयारीत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून वंचित बहूजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये जाणार असल्याचं बोललं जात होत. मविआ आणि वंचित बहूजन आघाडीमध्ये त्यासाठी जागावाटपाच्या चर्चाही चालू होत्या. पण काही जागांच्या आग्रहामुळे आणि जागांच्या आकड्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहूजन आघाडीमधील चर्चा तणावाच्या परिस्थितीमध्ये आहे.
त्यातच अॅड. प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टिका होत असून या पक्षांच्या अडमुठेपणामुळे जागावाटपाची चर्चा फिस्कटत असल्याचा आरोप सातत्याने करत आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून मात्र वंचित बहूजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये नक्कीच येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आपण महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी निवडणुकांसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जाणार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, "महाविकास आघाडी आबाधित राहील कि नाही हा प्रश्न आहे. पण आम्ही शेवटपर्यत महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी तयार आहोत."असे म्हटले आहे.