Sangli : सांगलीवाडी प्रभागात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारात सक्रिय
महाविकास आघाडीला मतदान करण्याचे मतदारांना आवाहन
सांगली : सांगलीवाडीत अनेक प्रश्र प्रलंबित आहेत. केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ देतील आणि नक्कीच परिवर्तन घडवतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत कोळी, दिपाली पाटील व अश्विनी कदम यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक तेरामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजीत कोळी, काँग्रेसच्या दिपालीपाटील ब अश्विनी कदम या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सांगलीवाडीतील मोहिते मंगल कार्यालय, राणाप्रताप चौक, पवार कॉलनी येथील बारकरी संप्रदाय हॉलमध्ये आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठका पार पडल्या.
बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिजीत कोळी म्हणाले, सांगलीबाडीत अनेक प्रश्र प्रलंबित आहेत. सात वर्षात विकासकामे रखडल्यामुळे मतदारांमधून परिवर्तनाची लाट तयार होत आहे. याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल. दिपालीपाटील व अश्विनी कदम म्हणाल्या, महिलांचे अनेक प्रश्र दुर्लक्षित आहेत. हे प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहेत. महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्यावी, यावेळी अॅड. संदीप जाधव, सुरेखा सातपुते, जगद्गुरू पाटील, अमृता चोपडे, सचिन कदम आदी उपस्थित होते. तर उमेदवारांनी दत्त चौक, शिवभारत चौक, राणाप्रताप चौक परिसरात पदयात्रा काढली..