महात्मा गांधीजींचे जीवन समाजासाठी प्रकाशस्तंभ
महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांचे प्रतिपादन : टिळकवाडी येथील वीरसौधमध्ये महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी
प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा गांधी यांचे जीवन व विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. सत्य, अहिंसा व साधेपणा ही गांधीजींची मूल्ये तऊण पिढीने जीवनात अंगिकारावीत. महात्मा गांधी यांचे जीवन समाजासाठी प्रकाशस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, माहिती व जनसंपर्क विभाग आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने टिळकवाडी येथील वीरसौध येथे महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्तिक पुढे म्हणाले, गांधीजींनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली. त्यांचे जीवन आणि विचार समजून घेण्यासाठी प्रत्येकाने त्यांचे चरित्र वाचावे. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
सत्य, अहिंसा, साधेपणा, त्याग गांधीजींच्या जीवनाची वैशिष्ट्यो
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. जी. केम्पण्णवर यांनी विशेष व्याख्यानातून महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत सत्य, अहिंसा, साधेपणा व त्याग ही गांधीजींच्या जीवनाची वैशिष्ट्यो होती. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, त्याग आणि समाजसेवेची भावना ऊजविण्याची गरज आहे. शास्त्रीजींचा साधेपणा, प्रामाणिकपणा, शिस्त व राष्ट्रनिष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑक्टोबर विशेषांकाचे प्रकाशन
माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुऊनाथ कडबूर यांनी प्रास्ताविक केले. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्या हस्ते ‘जनपद’ नियतकालिकाच्या गांधीजींच्या जीवनकार्यावर आधारित ऑक्टोबर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती व जनसंपर्क विभागातर्फे आयोजित ‘बापूजी’ निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विनायक मोरे व पथकाने भजन सादर केले.
यावेळी अन्न व पुरवठा खत्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक, स्मार्ट सिटी व्यवस्थापक संचालक कविता, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, फलोत्पादन खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड, स्वातंत्र्य सेनानी राजेंद्र कलघटगी, बसवराज हट्टीगौडर, अनिल पत्तार, श्रीरंग जोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.