गोव्यात उद्या महाशिवरात्री उत्सव
12:43 PM Feb 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : गोव्यात उद्या बुधवारी महाशिवरात्री उत्सव थाटात साजरा केला जाणार आहे. आज सायंकाळपर्यंत राज्यातील सर्व शिव मंदिरात उत्सवाची तयारी पूर्ण होईल. उद्या पहाटेपासून शिव अभिषेकाला प्रारंभ होईल. राज्यातील अनेक शिवमंदिरे ही उद्या भाविकांसाठी खुली राहतील. जुने गोवे येथील श्री गोमंतेश्वर मंदिर, श्री वडेश्वर महादेव मंदिर, नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर, तांबडी सुर्ल येथील महादेव देवस्थान, हरवळे येथील श्री ऊद्रेश्वर मंदिर तसेच काणकोण श्री मल्लिकार्जुन देवस्थान, मंगेशी येथील श्री मंगेश, तर नागेशी येथील नागेश देवस्थानात दिवसभर भक्तांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. गोव्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये शिवमंदिरे आहेत आणि या मंदिरामध्ये उद्या पहाटेपासून महाअभिषेकाला प्रारंभ होईल.
Advertisement
Advertisement