For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमावासियांना महाराष्ट्राच्या सवलती

01:24 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
सीमावासियांना महाराष्ट्राच्या सवलती
Advertisement

सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Advertisement

सांगली : मागील चाळीस-पंचेचाळीस वर्षात महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असताना सीमाप्रश्न का सुटला नाही? याबाबत राजकारण करण्याचा माझा पिंड नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलाच पाहिजे, हा विषय सुप्रिम कोर्टात आहे. प्रश्न सुटेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला ज्या सवलती मिळतात, त्यात मेडिकलच्या जागांसह सर्व सवलती सीमाभागातील सर्व 865 गावांना मिळत राहतील, अशी घोषणा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे बोलताना केली.  यावेळी तऊण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांचा 74 व्या वाढदिवसानिमित्ताने सोमवारी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भव्य गौरव करण्यात आला.हा कार्यक्रम सांगली मिरज रोडवरील कांतीलाल पुरूषोत्तम प्रशालेच्या क्रीडांगणावर पार पडला.

योळी सीमाप्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे प्रयत्न करावेत. तसा विश्वास सीमाबांधवांना द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. सीमाप्रश्न सुटण्याची आम्ही वाट पाहतोय, कर्नाटककडून याबाबत आक्रमकता वाढली आहे. सीमाभाग केंद्रशासीत करण्यासाठी महाराष्ट्राने आग्रह धरला पाहिजे. कोर्टाबाहेर हा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादांनी प्रयत्न करावेत त्यांना जयंतरावांनी मदत करावी. कर्नाटकात असलेल्या 25 लाख सीमाबांधवांची सुटका करावी, अशी कळकळीचे आवाहनही डॉ. किरण ठाकुर यांनी यावेळी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना केले.

Advertisement

व्यासपीठावर खासदार विशाल पाटील, आमदार गोपिचंद पडळकर, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, माजी पालकमंत्री अण्णासाहेब  डांगे, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप नेते पृथ्वीराज पाटील, महापौर धीरज सुर्यवंशी, जि. प. अध्यक्षा संगीता पाटील, उपमहापौर गजानन मगदूम, मनपा सभागृहनेते संदीप आवटी, भाजपा नेते शेखर इनामदार, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादी अजित पवार जिल्हाध्यक्ष प्रा. पदमाकर जगदाळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मनपा गटनेते युवराज गायकवाड, भाजपा नेते दिपकबाबा शिंदे, आनंदराव नलावडे, डॉ. प्रताप पाटील, जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, यांची उपस्थिती होती. यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय पारितोषिक विजेती प्रख्यात गायिका सावनी रवींद्र यांनी सादर केलेल्या अजरामर गीतविष्कारांने सांगलीकरांची मने जिंकली.

सीमाप्रश्न सुटलाच पाहिजे

सीमाप्रश्न सुटलाच पाहिजे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आम्ही आत्ता सत्तेत आलो, मागील अडीच वर्षामध्ये काँग्रेस आघाडीकडून राज्यात गडबड करून सत्ता मिळविली. त्यानंतरही आम्ही सत्तेत आलो आता स्थिरस्थावर आहोत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून सीमाप्रश्न कायम आहे. हा प्रश्न आता अधिक जटील झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही आपले चांगले संबंध आहेत. 2022 ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच अधिवेशनात सीमाप्रश्नासंदर्भात मी एक जुना जीआर बाहेर काढला. सीमाप्रश्न सुप्रिम कोर्टात आहे. तो सुटेपर्यंत सीमाभागातील विद्यार्थी व लोकांना महाराष्ट्रातील लोकाप्रमाणे सर्व सवलती मिळतील. असा निर्णय घेतला. तो निर्णय आजही कायम आहे. अमित शहा यांनी दोन्ही रांज्याच्या टॉपच्या आयएएस अधिकाऱ्यांची बैठक घेवून एकमेकांना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेण्यास सांगण्यात आले. आम्ही जे जे करता येईल तो करत आहोत.

पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा एवढे काम झालेच पाहिजे

सीमाप्रश्ना संदर्भात डॉ. किरण ठाकुर यांनी आजपर्यंत मोठा संघर्ष केलेला आहे. मी स्वत: याबाबत चार पाचवेळा बेळगावला गेलो. सीमाबांधवाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. महाराष्ट्र तुमच्याबरोबर आहे हा विश्वास सीमाबांधवाना द्या. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी चंद्रकांतदादांनी प्रयत्न करावेत. हा प्रश्न तुम्ही सोडविला तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल. मी स्वत: तुम्हाला हुडकून काढून तुमचा सत्कार करेन, अशी कोपरखोळी जयंत पाटील यांनी पालकमंत्र्यांना मारली. पालकमंत्री म्हणून तुमची कृती महत्वाची आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मेडीकलच्या जागा 50 पर्यंत वाढवा.

प्रारंभी डॉ. किरण ठाकुर यांचे विविध वाद्यांच्या निनादात मिरवणूकीने कार्यक्रमस्थळी आगमन झाले. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, तरूण भारतचे संस्थापक बाबुराव ठाकुर, माई ठाकुर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रारंभी सदगुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनच्यावतीने  डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. माधवी पटवर्धन, दिगंबर जगताप अतुल हंगे यांच्यासह 60 साधकांच्यावतीने डॉ. ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वप्रार्थना म्हणण्यात आली.

सीमाप्रश्न कोर्टाच्या बाहेर सोडवा : डॉ. किरण ठाकुर

सीमाप्रश्न सुटण्याची आम्ही वाट पाहतोय, कर्नाटकने बेळगावमध्ये विधानसौध बांधले आहे. कर्नाटक याबाबत आक्रमक होत चालला आहे. गेल्या 75 वर्षापासून हा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्वेकडील राज्याचे प्रश्न सोडविले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी विशेषत: सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अमित शहा यांच्याकडे सीमाप्रश्न कोर्टाच्या बाहेर सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांनी त्यांना मदत करावी. महाराष्ट्राने याबाबत आता अधिक आक्रमक झाले पाहिजे. साथी एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सिमालढयात बाळासाहेब ठाकरे, अण्णासाहेब पाटील आदी लोक सहभागी झाले होते. शरद पवार, छगन भुजबळ या नेत्यांनी आंदोलन व संघर्ष केला होता. धुर्तराष्ट्राची भुमिका घेऊ नका, कर्नाटकप्रमाणे वागा, असे खडे बोल डॉ. किरण ठाकुर यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सुनावले. तरूणभारतची देदीप्यमान वाटचाल सुरू असून लोकमान्य सोसायटीने 11800 कोटीच्या डिपॉझिटसह देशातील क्रमांक एकची संस्था होण्याचा मान मिळवला आहे.

मान्यवरांची उपस्थिती.

गौरव सोहळयास तऊण भारत संवादचे विभागीय संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, संपादक शिवराज काटकर, जाहिरात व्यवस्थापक संजीव डाळींबकर, मुंबई आवृत्तीचे संपादक प्रविण काळे, जाहिरात व्यवस्थापक संजय ननवरे,  विभागीय वितरण व्यवस्थापक अमर पाटील, लोकमान्य संचालक गजानन धामणेकर, रिजनल मॅनेजर सुदत्त पाठक, कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे प्रदीप पाटील, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी बलवंत भानकर, पीआर मॅनेजर सत्यव्रत नाईक, रिजनल व्यवस्थापक सुभाष मोरे, शाखा व्यवस्थापक पंडितराव पाटील, सतिश मेहता, श्रीराम खोचीकर, ओंकार कुलकर्णी, प्रिया कवठेकर, एच.आर. मॅनेजर नयन शिंदे, मार्केटिंग मॅनेजर सूरज पाटील यांच्यासह तरूण भारत संवाद सांगली कार्यालय व्यवस्थापक राहुल गोखले, वितरण व्यवस्थापक अनुप पुरोहित, संगणक व्यवस्थापक गजानन घाडगे यांच्यासह तरूण भारत संवाद आणि   लोकमान्य परिवारातील सदस्य उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार

रमाकांत मालू समृध्दी ग्रुप, सतिश मालू उमेद ग्रुप, चंद्रकांत पाटील मराठा उदयोग परिषद, सचिन पाटील डेक्कन म्यॅन्यु असो, विनोद पाटील, चेअरमन एमआयडीसी असो., डॉ बिदुंसागर पलंगे, डॉ अजित मेहता, डॉ शिल्पा दाते पहिल्या आयर्न लेडी, डॉ रियाज मुजावर, डॉ. शबाना मुजावर, विनोद परमशेट्टी, डॉ अनिल मडके, डॉ दिलीप पटवर्धन, डॉ. माधवी पटवर्धन, डॉ रमाकांत पाटील, डॉ तुषार धोपाडे, मनोहर सारडा, बिल्डर दिपक सुर्यवंशी, प्रमोदतात्या शिंदे, सुनिल कोकीतकर, जे के बापू जाधव, बाळासाहेब पवार, राजीव पाटील-राज फर्टीलायझर, हर्ष घाटगे, शीतल थोटे, सतिश पाटील पोखर्णीकर, श्dरीकांत तारळेकर, प्रमोद चौगुले अर्कीटेक, जयदीप अभ्यंकर व्यवस्थापक गणपती संस्थान, श्dरीकांत माधवराजे व सौ अनुसयाराजे पटवर्धन, सुभाष कुलकर्णी तासगाव, श्dरीनिवास जरंडीकर ,नगरसेवक लक्ष्मण नवलाई, किरणतात्या लाड, राहुल काशिद, निखिल पुजारी, कुमार जैनापुरे, अर्चना पाटील, नसरूद्दीन नदाफ, अजिंक्य रूपलग, भारत गंगाणे, प्रकाश पुंभोजकर, घनश्याम सुर्यवंशी, अजित पाचोरे, मेधा भागवत, लताताई देशपांडे, संजय चव्हाण (विसावा मंडळ), सतिश दुधाळ (कृष्णामाई स्वच्छतादूत), राकेश दड्डणावर (निर्धार फाऊंडेशन), मुस्तफा मुजावर (इन्साफ फाऊंडेशन), कैलास वडर, अर्चना मुळे (संवांदिनी ग्रुप), रेखा पाटील (सई ग्रुप), वैजनाथ महाजन, सदानंद कदम, विजय बक्षी, सुभाष कवडे, अॅड अभिषेक खोत, संप्रदा बीडकर जिल्ह माहिती अधिकारी, बाळासाहेब कलशेट्टी ट्रान्सपोर्ट असो.

Advertisement
Tags :

.