For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या घरी गणरायाचे आगमन; पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून आणली बाप्पाची मूर्ती

06:09 PM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या घरी गणरायाचे आगमन  पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून आणली बाप्पाची मूर्ती
Advertisement

चिपळूण : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून तसेच ‘शालू झोका देगो मैना’ या गाण्यातील अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे अभिनेते प्रभाकर मोरे यांच्या चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील निवासस्थानी गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले.

Advertisement

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाच्या मूर्तीचे स्वागत केले. डोक्यावरून गणरायाची मूर्ती घरी आणत त्यांनी बाप्पाचे आगमन केले. यावेळी कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

गणपतीची मूर्ती घरी आणल्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी पार पाडत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशोत्सवासाठी प्रभाकर मोरे यांचे संपूर्ण कुटुंब आपल्या मूळ गावी वहाळ येथे दाखल झाले आहे.

Advertisement

यंदाचा गणेशोत्सव पाच दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. या काळात दररोज आरती, भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मोरे यांच्या निवासस्थानी गणेशभक्तीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

गणरायाच्या आगमनाने मोरे यांच्या घरासह संपूर्ण वहाळ परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पुढील पाच दिवस भक्ती, श्रद्धा आणि पारंपरिक उत्सवाचा आनंद अनुभवायला मिळणार आहे.

Advertisement

.