महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्राचा 4 गड्यांनी विजय

06:01 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / हैद्राबाद

Advertisement

2024 च्या सय्यद मुस्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात महाराष्ट्राने केरळचा केवळ 1 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी पराभव केला.

Advertisement

या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून केरळला प्रथम फलंदाजी दिली. केरळने 20 षटकात 7 बाद 187 धावा जमविल्या. त्यानंतर महाराष्ट्राने 19.5 षटकात 6 बाद 189 धावा जमवित विजय नोंदविला.

केरळच्या डावामध्ये कर्णधार संजू सॅमसनने 3 चौकारांसह 19, रोहन कुनुमलने 24 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 24, मोहम्मद अजहरउद्दीनने 29 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 40, सचिन बेबीने 25 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 40, अब्दुल बशीतने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 24 धावा जमविल्या. केरळच्या डावात 8 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. महाराष्ट्रातर्फे दिव्यांग हिंगनेकर आणि अर्षिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी 2 तर मुकेश चौधरी आणि सोळंकी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना महाराष्ट्राच्या डावात सलामीच्या अर्षिन कुलकर्णीने 21 चेंडूत 3 चौकारोसह 24, राहुल त्रिपाठीने 28 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 44, अझीम काझीने 26 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 32, निखिल नाईकने 1 चौकारांसह 10, दिव्यांग हिंगनेकरने 18 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 43 तर घोषने 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 13 धावा जमविल्या. महाराष्ट्राला 18 अवांतर धावा मिळाल्या. केरळतर्फे निदेश आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 2 तर विनोदकुमार आणि बसीत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: 20 षटकात 7 बाद 187, महाराष्ट्र 19.5 षटकात 6 बाद 189

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article