महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

येत्या तीन दिवसात महाराष्ट्र गारठणार

11:51 AM Dec 10, 2024 IST | Pooja Marathe
Maharashtra will experience frost in the next three days
Advertisement
कोल्हापूर
यंदा महाराष्ट्रात थंडीची  लाट जोरदार आहे. त्यातच फेंगाल वादळाच्या प्रभावामुळे गेला एक आठवडा थंडीने दडी मारली होती, तर अनेक ठिकाणी पावसाने अचानक हजेरी लावली. पण आता थंडी पूर्ववत होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतात चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे येत्या तीन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट येणार असुन दक्षिणेत मात्र पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. उत्तर आणि दक्षिण भागात परस्पर विरोधी वातावरण तयार होत आहे. जम्मू काश्मिर, लडाख, उत्तराखंड,राजस्थान, उत्तर भारत येथे मंगळवारी थंडी सक्रिय होती. त्यामुळे  मध्य भारतात १० ते १३ या कालावधीत दाट धुके आणि कडाक्याची थंडी पडणार आहे.
Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article