For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

MH Weather Update: राज्यात कुठे मुसळधार तर कुठे हलका पाऊस, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

12:18 PM May 16, 2025 IST | Snehal Patil
mh weather update  राज्यात कुठे मुसळधार तर कुठे हलका पाऊस   या  जिल्ह्यांना येलो अलर्ट
Advertisement

प्रशासनाने या परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Advertisement

Maharashtra Weather Update: हवामान खात्याने राज्यात पुणे, मुंबई, आहिल्यानगरसह घाट परिसरात 15 आणि 16 मे या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे 15 तारखेला दुपारी घाट परिसरातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पाऊस झाला. आज पुन्हा एकदा पुण्यासह परिसरातील गरमी वाढली असून ऊन्हाने नागरिक हैराण झाले आहेत.

दरम्यान, पुणे हवामान खात्याकडून मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मराठवाड्यातील बीड, लातूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भातसह वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

आज राज्यात पुणे, सातारा, आहिल्यानगर, बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसह पावसाची शक्यता आहे. या परिसरात ताशी 50 ते 60 किमी वाऱ्याच्या वेगासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

प्रशासनाने या परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता उर्रवरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे व आसपासच्या परिसरात 15, 16, 17 तारखेला आकाश अशंत: ढगाळ असणार आहे. त्यामुळे या भागांत मेघगर्जनेसह पावसाची आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून रत्नागिरी जिह्यात 18 मेपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची, वीज चमकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जिल्ह्यात 18 मेपर्यंत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे, असे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.