For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘टीईटी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि साथीदाराला बिहारमध्ये अटक‘ आरोपींची संख्या 14 वर पोहोचली‘

10:01 PM Jul 25, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
‘टीईटी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि साथीदाराला बिहारमध्ये अटक‘ आरोपींची संख्या 14 वर पोहोचली‘
Advertisement

ठाणे दि.25 प्रतिनिधी
देशात पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला दुसरीकडे सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी तब्बल 36 दिवसानंतर दिल्लीतील जंतर मंतर येथून आंदोलन मागे घेतल्याची घोषणा दिली.

Advertisement

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील अखेर मुख्य सूत्रधार विजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याचा साथीदार इंद्रजित सिंग या दोघांना ठाणे पोलिसांच्या विशेष पोलीस तपास पथकाने(ता.23) गुरूवारी पहाटे बिहारमधून अटक केली. या दोघांनाही ठाण्यात आणण्यात आले.

याप्रकरणात यापूर्वी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली असून यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 14 वर पोहोचली आहे.
पेपरफुटी प्रकरणी 12 वर्षाच्या मोदी सरकारच्या कारकिर्दीत पहिल्यादा विद्यार्थ्याच्या आंदोलनामुळे शुक्रवारी सरकारच्या एका मंर्त्याचा राजीनामा दिल्याची घटना घडली परीक्षा सुरू होण्यापूर्वीच टीईटी प्रश्नपत्रिकांच्या प्रती महाराष्ट्रात ठाणे जिह्यात भिवंडीतील डोंगराळ भागातून भिवंडी पोलिसांनी जप्त केल्या होत्या.

Advertisement

या कारवाईनंतर टीईटी परिक्षेचा पेपर फुटल्याचे देशभरात उघड होताच सरकारने तात्काळ परिक्षा रद्द केल्याची घोषणा केली. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने ठाण्याचे सह पोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतफत्वाखाली विशेष पोलीस तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. यात भिवंडीचे पोलिस उपायुक्त पवन बनसोड, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विजय मराठे यांच्यासह इतर अधिकार्यांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास करून पथकाने एकूण 12 आरोपींना अटक केली होती.

दोन आरोपींना पोलिसांनी गुऊवारी अटक केल्याने आरोपींची संख्या 14 वर पोहोचली आहे.शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिकांची छपाईचे कंत्राट माहिम पत्रण प्राव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचा छापखाना उत्तरप्रदेशातील आग्रा भागात आहे. येथूनच पेपर फुटल्याचे आरोपींच्या तपासातून उघडकीस आले होते. अटकेत असलेल्या तिघा आरोपींनी मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला छापखान्यातून प्रश्नपत्रिका बाहेर काढून दिल्याची बाब तपासात समोर आले होते. तेव्हापासून विजेंद्र गुप्ता याच्या मागावर पोलिसांची पथके होती.

आरोपी, नेहमी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी माग काढत विजेंद्र आणि त्याचा साथीदार इंद्रजित सिंग या दोघांना बिहारमधून अटक केली. गुरूवारी पहाटे ही कारवाई करत पोलिसांनी या दोघांना ठाण्यात आणले असून पोलिसांची पथके त्यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, विजेंद्र हा प्रिंटिंग प्रेसमधील कामगारांना सातत्याने पैसे देऊन त्यांच्या संपर्कात राहत होता. महत्त्वाची प्रश्नपत्रिका प्रेसमध्ये आली की कामगारांच्या माध्यमातून ती बाहेर काढून तिची विक्री करायचा, आरोपींची पोलिस पथकाकडून चौकशी सुरू आहे.

Advertisement
Tags :

.