महाराष्ट्राला 64 धावांची आघाडी, तनयचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था, कोलकाता
येथील ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट क गटातील सामन्यात मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्राने पहिल्या डावात 9 बाद 207 धावा जमवित बंगालवर 64 धावांची आघाडी मिळविली. तत्पूर्वी बंगालचा पहिला डाव 143 धावांत आटोपला होता.
बंगालच्या पहिल्या डावात अभिषेक पोरेलने 8 चौकारांसह 54, प्रामाणिकने 5 चौकारांसह 31, घरामीने 4 चौकारांसह 19, कर्णधार ईश्वरनने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. महाराष्ट्रातर्फे संघवी आणि दधे यांनी प्रत्येकी 3 तर हंगिरगेकर व वीर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात तनय संघवीने नाबाद अर्धशतक झळकविले. मोहम्मद शमी, मोहम्मद कैफ आणि शाहबाज अहमद यांची गोलंदाजी प्रभावी झाली. महाराष्ट्रच्या डावामध्ये संघवी 1 षटकार आणि 3 चौकारांसह 57 धावांवर खेळत आहे. वीरने 3 चौकारांसह 28, कर्णधार पृथ्वी शॉने 2 चौकारांसह 12, नवलेने 5 चौकारांसह 28, राजवर्धन हंगिरगेकरने 2 षटकारांसह 24 धावा जमविल्या. दधे 4 चौकारांसह 22 धावांवर खेळत आहे. दधे आणि संघवी यांनी शेवटच्या गड्यासाठी अभेद्य 49 धावांची भागिदारी केली. मोहम्मद शमीने 3, मोहम्मद कैफने 2, शाहबाज अहमदने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : बंगाल प. डाव सर्वबाद 143, महाराष्ट्र प. डाव 9 बाद 207 (संघवी ख्टोळत आहे 57, वीर 28, नवले 28, हंगिरगेकर 24, दधे खेळत आहे 22, मोहम्मद शमी 36 धावांत 3 बळी, शाहबाज अहमद 34 धावांत 3 बळी, मोहम्मद कैफ 2 बळी).
