For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर खटल्यात संशयितांचा जबाब नोंद

06:52 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर खटल्यात  संशयितांचा जबाब नोंद
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटला क्रमांक 126 ची बुधवारी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुनावणी झाली. 24 पैकी 19 संशयित सुनावणीला हजर होते. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. आता या खटल्याची पुढील सुनावणी 7 मार्च रोजी होणार असून त्यावेळी बचाव पक्षासह सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटविण्यात आल्यानंतर गावात उद्रेक झाला होता. त्यावेळी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळे सात गुन्हे दाखल केले होते. यापैकी पाच खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली असून त्यामध्ये सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर उर्वरित दोन खटल्यांची सुनावणी सुरू आहे. खटला क्रमांक 126 मध्ये अर्जुन नागाप्पा गोरल, चांगदेव सातेरी देसाई, अनंत भरमाजी चिठ्ठी, वृषेशन चंद्रकांत पाटील, संभाजी भाऊराव हट्टीकर, शिवाजी शंकर कदम, सुनील निंगाप्पा धामणेकर, श्रीकांत शिवाजी नंदुडकर, राहुल मारुती कुगजी, नागेश सुभाष भोभाटे, सुनील रामा कुंडेकर, रवळू महादेव कुगजी, केशव कृष्णा हलगेकर, गणपती इराप्पा पाटील, नामदेव विठ्ठल नायकोजी, केशव महादेव पाटील, रमेश जयराम धामणेकर, रामचंद्र नारायण कुगजी, सतीश मनोहर कुगजी यांच्या विरोधात खटला सुरू होता. मात्र सदर खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्याने परशराम मारुती कुंडेकर, गणेश ऊर्फ तांबडा नारायण पाटील, जयंत बाबू पाटील, सातेरी यल्लू बेळवटकर, रामचंद्र ईश्वर बागेवाडी यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे 19 जणांविरोधात हा खटला सुरू आहे.

Advertisement

बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी 19 जण हजर होते. त्यामुळे सर्वांचा जबाब नोंदविण्यात आला. आता या खटल्याची पुढील सुनावणी 7 मार्च रोजी होणार असून त्यावेळी बचाव पक्षासह सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला जाणार आहे. या खटल्यात बचाव पक्षातर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचण्णावर काम पाहत आहेत.

Advertisement
Tags :

.