कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटल्यात गैरहजर राहणाऱ्यांना वॉरंट

06:22 AM Dec 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिन्ही खटल्यांची सुनावणी 16 डिसेंबरला होणार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक प्रकरणातील 3 खटल्यांची सुनावणी शनिवार दि. 6 रोजी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात झाली. यामधील खटला क्र. 122 मध्ये आरोपींचा जबाब नोंदविला जाणार होता. मात्र 38 पैकी 10 जण गैरहजर राहिल्याने न्यायालयाने संबंधितांना वॉरंट जारी केले आहे. खटला क्र. 126 मध्ये 47 जणांवर खटला सुरू असून आजच्या सुनावणीवेळी सार्वजनिक बांधकाम खात्यातील दोघा अभियंत्यांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी या खटल्यात आरोपींचा जबाब नोंदविला जाणार आहे. खटला क्र. 794 मध्ये 9 जणांच्या विरोधात खटला सुरू असून यामध्ये तत्कालीन गुन्हा दाखल अधिकारी जॉक्सन डिसोजा यांची साक्ष नोंदविण्यात आली.

या खटल्याची पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार असून, यामध्ये त्या दिवशी आरोपींचा जबाब नोंदविला जाणार आहे. खटला क्र. 122 मध्ये आरोपींचा जबाब नोंदविला जाणार होता. पण 38 पैकी 10 जण गैरहजर राहिल्याने न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत संबंधितांना वॉरंट जारी केले आहे. या खटल्याचीदेखील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे या तिन्ही खटल्यातील आरोपींनी पुढील सुनावणीला गैरहजर न राहता उपस्थित रहावे, असे आवाहन वकिलांनी केले आहे. या खटल्यांचे कामकाज अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शाम पाटील पाहत आहेत.

Advertisement
Next Article