MH SCC Exam Result 2025 : राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्के, पुन्हा मुलींचीच बाजी
यावर्षी राज्याचा 1.71 टक्क्यांनी निकाल घटला आहे
Maharashtra SCC Exam Result 2025 : मागील काही दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबतची विद्यार्थ्यांची धाकधूक आता संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला असून यावर्षी 1.71 टक्क्यांनी निकाल घटला आहे. याशिवाय नागपूरचा निकाल सर्वात कमी म्हणजेच 90.78 टक्के इतका लागला आहे.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात मुलींचा निकाल 96.14 टक्के लागला आहे. राज्यात दरवर्षीप्रमाणे दहावीच्या निकालातही कोकण विभाग अव्वल स्थानी कोकणाचा निकाल 99.82% लागला आहे. तर या निकालात कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे, कोल्हापूर विभागाचा निकाल 96.78% लागला आहे. त्या खालोखाल मुंबईचा निकाल 95.84% लागला आहे.
विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुणपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध होईल, तसेच त्याची प्रिंट काढून घेता येणार आहे. यंदा दहावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च मार्चमध्ये घेण्यात आली.
या परीक्षेत राज्यातील लाखो तर कोल्हापूर विभागातून 1 लाख 32 हजार 497 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यावर्षी कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून विभागाचा निकाल 96.78% लागला आहे. तसेच त्नागिरी जिह्यातून 18 हजार 884 विद्यार्थी तर सिंधुदुर्ग जिह्यातून 9 हजार 7 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. दरम्यान, कोकण विभाग नेहमीप्रमाणे अव्वल स्थानावर असून या विभागाचा निकाल 99.82% लागला आहे. यावर्षी देखील राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. परंतु यावर्षी राज्यात दहावीची निकाल जवळपास 1.71 टक्क्यांनी निकाल घटला आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
- कोकण : ९९.८२ टक्के
- मुंबई : ९५.८४ टक्के
- पुणे : ९४.८१ टक्के
- नागपूर : ९०.७८ टक्के
- छत्रपती संभाजीनगर : ९२.८२ टक्के
- कोल्हापूर : ९६.७८ टक्के
- अमरावती : ९२.९५ टक्के
- नाशिक : ९३.०४ टक्के
- लातूर : ९२.७७ टक्के
सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी
दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार सवलतीचे गुण दिले जातात. कोल्हापूर विभागात चित्रकलेसाठी 30 हजार 693, लोककलेसाठी 18 हजार 589, शास्त्रीय कलेसाठी 1 हजार 681 आणि क्रीडासाठी 4 हजार 345 असे एकूण 50 हजार 997 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या
दहावीच्या परीक्षेत प्रथम, व्दितीय आणि उत्तीर्ण श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 75 टक्केपेक्षा जास्त गुण 46 हजार 761 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. तर 60 ते 75 टक्केपर्यंत 44 हजार 155 विद्यार्थींनी गुण मिळवले आहेत. 55 ते 60 टक्केपर्यंत 27 हजार 140 विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आहेत. तर 7 हजार 324 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्हानिहाय दहावीचा निकाल
जिल्हा प्रविष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी
कोल्हापूर 53726 52394 97.52
सातारा 37203 35997 96.75
सांगली 38492 36989 96.09
एकूण 129421 1253380 96.87